औरंगाबाद, ता. ९ - सिडकोने औरंगाबाद महानगर पालिका हद्दीलगत २८ गावातील १५००० हेक्टर क्षेत्राच्या औरंगाबाद झालर क्षेत्राकरिता प्रारूप विकास आराखडा ३ फेब्रुवारीला महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध केला आहे.
या आराखड्यात समाविष्ट प्रस्ताव, तपशिलात्मक अहवाल आणि विकास नियंत्रण नियमावली संदर्भात इच्छुकांकडून सूचना व हरकती मागविण्यासाठी ७ फेब्रुवारी २०११ रोजी वृत्तपत्रांमधून जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. शासनपत्रात ही जाहीर सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात इच्छुकांनी आपल्या सूचना व हरकती सादर कराव्यात. हा प्रारूप विकास आराखडा अवलोकनार्थ सिडको च्या निर्मल, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात तसेच नियोजन विभाग, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई आणि सिडको कार्यालय, नवीन औरंगाबाद येथे उपलब्ध आहे.
तसेच हा आराखडा परिशिलनाकरिता जिल्हाधिकारी औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद मुख्य प्रशासक (नवी शहरे), सिडको नवीन औरंगाबाद, उपसंचालक, नगर नियोजन विभाग, औरंगाबाद, सहाय्यक संचालक, नगर नियोजन विभाग औरंगाबाद, तहसिलदार औरंगाबाद आणि संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
प्रारूप आराखड्याचा प्रस्ताव, नियमावली आदी तपशिलासह अध्ययनाकरिता सिडकोच्या संकेत स्थळावर (www.cidcoindia.com) औरंगाबाद फ्रिंज एरिया लिंकवरून डाऊनलोड करता येईल. हा संपूर्ण आराखडा विक्रीकरिता सिडको कार्यालय नवीन औरंगाबाद येथेही उपलब्ध आहे. या संदर्भातील आपल्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात मुख्य प्रशासक (नवीन शहरे), सिडको कार्यालय, उद्योग भवन, नवीन औरंगाबाद येथे सादर कराव्या, असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.