उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. भुजबळ यांच्यासमवेत खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हे सुद्धा होते. या दोघांनीही राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री भुजबळ यांचाही आज वाढदिवस असून त्यांनाही राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.