मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भीमसेन जोशी निधन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पंडित भीमसेन जोशी यांचे निधन

सुमारे पन्नास वर्षांपासून संगीत क्षेत्रात आपल्या खड्या आवाजाने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या पंडित भीमसेन जोशी यांची प्राणज्योत आज मालवली. आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्‍या संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध होती. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती.