मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भीमसेन जोशी सुमनांजली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला

मुंबई, ता. २४ - पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या क्षितिजावर तेजाने तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला, या शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. किराणा घराण्याचे शिष्य असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांचे ख्याल गायकीवर प्रचंड प्रभुत्व होते. कन्नड, हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी भक्तीगीते आणि अभंगांचे सादरीकरण केले. शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ आणि दर्दी रसिकांबरोबरच सामान्य नागरिकांच्या मनावरही त्यांनी गारूड केले. त्यांचा विशिष्ट खर्जातील आवाज आणि ताना घेण्याची पद्धत रसिकांवर मोहिनी घालत असे. अलिकडे, मिले सुर मेरा तुम्हारा..., आणि भारतबाला च्या राष्ट्रगीताच्या व्हिडिओमध्येही त्यांचे गायन आणि व्यक्तीमत्व यांची छाप अखिल भारतीयांच्या मनावर उमटली. पुण्यात सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्या गुरुंना आदरांजली वाहण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्यासह अनेक शिष्यांची देणगी या गायकाने देशाला दिली असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही श्री. भुजबळ य