मुंबई, ता. ३ - मुंबई येथे संवादिनी संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संवादिनी संस्था प्रामुख्याने ओबीसी वर्गासाठी कार्यरत असून या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातात. याचा एक भाग म्हणून संस्थेने राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित केली आहे. लेख स्पर्धेचे विषय असे- १. बहुजनांच्या विकासात शासकीय योजनांची भूमिका, २. मी, माझी संस्था आणि बहुजन विकास, ३. आजचा बहुजन समाज आणि राजकारण, ४. आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व इ. उपरोक्त चार विषयांसाठी स्पर्धा असून शब्दमर्यादा १५०० ते २०००० पर्यंत असावी. ही लेख स्पर्धा सर्वांसाठी खुली असून २० मे २०११ पर्यंत अरूण लावंड, सी/२४, सहकार नगर, वडाळा, मुंबई - ३१ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी अरूण लावंड ९८६९७४६५१८ किंवा श्रीकृष्ण नाईक ९७५७१७५३९४ येथे संपर्क साधावा.