मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.