मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तारकर्ली किनारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम लवकरच

मुंबई, - मुंबईसह राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला शासनाचे नेहमीच प्राधान्य असून गणपतीपुळे व तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. असे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलिया येथील शुअर लाइफ सेव्हिंग या संस्थेचे प्रमुख श्री. नॉर्मन फार्मर यांच्यासह राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटीचे प्रमुख पी. डी. शर्मा, युवराज चंदेशा आणि जूहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड या संस्थेचे सुनिल कनोजिया यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. अशासकीय संस्था (एनजीओ) असलेल्या या संस्थांनी संयुक्तपणे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर लाइफगार्ड सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. जुहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड संस्थेतर्फे कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय लाइफ-सेव्हिंग उपक्रम व्यवस्थितरित्या चालविण्यात येत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. ते म्हणाले, की समुद्रकिनार्‍यांवर लाइफसेव्हिंग सुविधा आम्हाला विकसित करावयाचीच आहे. त्यादृष्टीने या संस्था...