कोरेगाव भीमा - संतांनी समाज घडवण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या अखिल भारतीय बहुजन संत साहित्य महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महासंमेलनाचे उद्घाटन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, प्रीतिसुधाजी महाराज, आमदार अशोक पवार, सौ. कमलताई ढोले पाटील, प्रा. हरी नरके, प्रा. लक्ष्मण मुंजाळे, डॉ. अजित नदाफ, पी. रघुनाथ, अशोक शहा, अरुण बुर्गाडे, प्रा. दगडे, प्रा. रमणलाल सोनग्रा, महादेव तरवडेकर, श्रवणकुमार महेंद्रकुमार, तसेच स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, शिवदास उबाळे, मुख्य प्रवर्तक महेंद्र धावडे, अमित वाघोलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदीप कंद, अशोक सावंत, रामदास दाभाडे, शंकर भुमकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री.भुजबळ म्हणाले, 'पर्यावरणाचा सामाजिक संदेश संत तुकाराम महाराजांनीच आपल्या अभंगातूनही दिला, तर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून ...