मुंबई येथे मंत्रालयात पंढरपूर शहराच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके आदी. मुंबई, ता. ४- पंढरपूर शहराच्या दहा किलोमीटर परिसराचा विकास आराखडा त्वरीत तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक आदींसह पंढरपूरचे नगराध्यक्ष उपस्थित होते. श्री. पवार यांनी पंढरपूर विकास प्राधिकरण, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाशी संबंधित बाबींचा आढावा यावेळी घेतला. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विकास कामे करताना शासनाच्या विविध विभाग आणि यंत्रणांमध्ये समन्वय राखावा. कामे दर्जेदार होण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात. विभागीय आयुक्त सर्व कामांवर देखरेख करतील आदी सूचना दिल्या. शहरातील रस्ते, नगरपालिकेच्या महागाई भत्ता, अनुदान, यात्रा अनुदान, स्टॉर्म वॉटर ड...