मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आषाढी एकादशी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा; पथक सज्ज

मुंबई, ता. २३ - श्रीक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीनित्त आळंदी ते पंढरपुर मार्गावर पालख्यांबरोबर जाणार्‍या वारकरी बांधवांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे २२ जून ते ११ जुलै या कालावधीत मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी संस्थेचे पथक सज्ज झाले आहे. यावर्षी संस्थेचे वैद्यकीय पथक शनिवारी (ता. २५) नेहरूनगर, कुर्ला, मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यास के. ई. एम. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, असे संस्थ्चे विश्वस्त डॉ. सुनिल हलुरकर यांनी कळविले आहे. ही मोफत वैद्यकीय सेवा संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपुर या मार्गावर वारकर्‍यांना दिली जाईल. यासाठी संस्थेने सुमारे आठ रुग्णवाहिका, औषधांचा पुरेसा साठा आणि सेवाभावी १०० डॉक्टर व १५० स्वयंसेवकांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. या समाजसेवी उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर पंढरपुरकडे पायी जाणार्‍या वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक ते औषधोपचार व वैद्यकीय सेवा ट्रस्टतर्फे अगदी मोफत पुरविली जाईल. पालखीच्या मार्गा