मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Ramesh Bhatnagar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळा

(नवी मुंबई)- चित्रपट निर्मिती या क्षेत्रात तरुण वर्ग मोठया प्रमाणात आकर्षित होत आहे, परंतु त्यांना असलेल्या अपूर्ण ज्ञानामुळे त्यांची दिशाभूल केली जाते. हे सर्व लक्षात घेऊन अनघा इव्हेंट्स व सिनेबझ अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स च्या वतीने तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक इम्तियाज हुसैन, प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर तसेच दिग्दर्शक मिलिंद कवडे, आणि दिग्दर्शक रमेश भटनागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.ही कार्यशाळा दिनांक २२, २३ आणि २४ जुलै २०१६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत चित्रपट निर्मितीत ज्यांना आवड आहे त्यांना सहभाग घेता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येईल. ही कार्यशाळा सिनेबझ अकॅडमी, योग विद्या निकेतन, वाशी डेपो जवळ, सेक्टर ९ (अ), वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत असून इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . २२ जुलै रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन होईल तसेच या दिवशी मिलिंद क...