मुंबई, ता. २८ - महागाई नियंत्रणाबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीला चालना देणारा तसेच कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक दर वृद्धीचे सूतोवाच करणारा अर्थसंकल्प 'आम आदमी' ला दिलासा देणारा तसेच परिपूर्ण ठरला आहे. या शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी, केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. शेती, शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत असतानाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी त्यावर कोणताही कर न लावता आणि प्राप्तीकरमर्यादा वाढवून नोकरदार वर्गालाही दिलासा देणार्या या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे, असे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कृषी क्षेत्राने ५.४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली ही अत्यंत चांगली बाब आहे. ही वाटचाल आगामी वर्षातही कायम रहावी यासाठी अर्थसंकल्पात विचार केला आहे. भाजीपाला, डाळींच्या उत्पादनासाठी भरीव आर्थिक तरतूद, कृषी कर्जमर्यादा ४.७५ लाखांवर, खतांवर रोख सबसिडी, सिंचन उपकरणे व कृषी अवजार स्वस्त, कोल्ड स्टोअरेज प्...