दिवसभर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला काही तासांचा पण क्षणांप्रमाणे वाटणारा वेळ..भावी आयुष्य , मैत्रीच्या पुढच्या प्रवासात घालवायच्या आयुष्याची रंगविलेली स्वप्नं..रात्री झोपताना येणाऱ्या उद्याच्या कल्पनेचे कप्पे हृदयातून मनात साचवून झोपलेला तो किंवा ती...। खिडकीबाहेरून येणारा मंद वाऱ्याबरोबरचा सुवासाचा दरवळ..आणि , आणि सकाळी हळूच गालावर मोरपीस फिरल्याप्रमाणे त्याने किंवा तिने स्पर्श करून व्हॅलेंटाइन – डे च्या दिलेल्या शुभेच्छा..। एक काळ होता , त्या काळात घरातल्या महिलांनी परपुरुषाच्या समोर यायचे नाही. अगदी महत्त्वाचंच असल्यास अथवा संभाषण साधायचं असल्यास पडद्यामागे राहून बोलणी करायची..। या प्रघातामध्ये कालांतराने बदल होत जाऊन एकविसाव्या शतकात तर हे सगळं पडद्याआड गेलं आहे. वडील म्हणजे हिटलर वाटणाऱ्या मुलांना आता वडील म्हणजे मित्रच वाटू लागले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलू नये , बघू नये..मुलीने मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू नये अशा विचारांची बैठक आता बदललीये. सकाळी ...