मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Kesari Housing लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'केसरी हाऊसिंग' च्या कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई, ता. १७ - पर्यटन उद्योगात ज्याप्रमाणे "केसरी" ने मराठी माणसाचा विश्वास संपादन केला आहे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रातही 'केसरी हाऊसिंग' ला निश्चित यश मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. हिमांशू केसरी पाटील आणि शशी जाधव यांनी 'केसरी हाऊसिंग' या गृहबांधणी उद्योगास प्रारंभ केला आहे. एल. जे. रोडवर (माहिम पश्चिम) केसरी हाऊसिंगच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्र्यंबकेश्वरच्या सत्यानंद योगपीठाचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांच्यासह केसरी पाटील, सुनिता पाटील, वीणा पाटील, आदी उपस्थित होते. कार्यालयास सौ. रश्मी ठाकरे, किरण शांताराम, अतुल परचुरे आदींनी भेट दिली.