शनिवार, ६ डिसेंबर, २०१४
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार
मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.
रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४
स्टर्लिंग महाविद्यालयाचे औषध साक्षरता जनजागृती अभियान
नेरूळ- येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या वतीने नुकताच ५३ वा फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. इंडियन फार्मा असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फार्मसी सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या वतीने औषध साक्षरता जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कसा वापर करावा, कोणते औषधे सेवन करावी औषध विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, त्यांची साठवण कशी करावी याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या सप्ताहाच्या निमित्ताने फार्मसी विद्यार्थांसाठी महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ हेमंत मोंडकर, महाराष्ट्र आरोग्य विद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ शेखर राजदरेकर, प्राचार्य डॉ घाटगे, डॉ बाविस्कर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये फार्मसी क्षेत्रातील नामवंत मंडळी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
तसेच, सबंधित वेळेत याच दिवशी महाविद्यालयाच्या बाहेरील पटांगणात भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरविले जाणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय रसायनशास्त्राचे विभागाचे मुख्य प्राचार्य आर. जी. पाटील यांनी दिली.
नवी मुंबई सायन्स फाउंडेशन तर्फे ‘जागतिक अणुउर्जा दिवस’
वाशी : नवी मुंबई सायन्स फाउंडेशन, भारतीय किरणोत्सार संरक्षण परिषद आणि महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय येथील बॅरीस्टर पी.जी. पाटील सभागृहात मंगळवार २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘जागतिक अणुउर्जा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक अणुउर्जा दिवसानिमित्त ‘भविष्यातील उर्जा आणि पर्यावरणाचे एकत्रित जतन’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी चेअरमन व पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतरही काही मान्यवरांना सबंधित विषयांवर माहिती सांगण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अरुण भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ‘अणुउर्जा निर्मिती आणि किरणोत्साराचा वापर व यातील सुरक्षितता’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा विभागातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि नवी मुंबईच्या महाविदयालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात परिसंवाद स्वरूपाची चर्चा होणार असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे संयोजक एस.पी. अगरवाल यांनी दिली. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे सदस्य मधुकर बेल्लारी यांनी केली आहे.
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४
जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर किंवा संध्याकाळी 6 वाजता करण्यात येईल. बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी या निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील.
नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम वरीलप्रमाणेच असून या दोन जिल्ह्यातील निवडणुकांची मतमोजणी बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी होणार असून त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार असून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात तसेच पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४
जळगावात 28 पासून ‘कृषी व डेअरी’ प्रदर्शन; चार दिवसीय प्रदर्शनात असणार प्रात्यक्षिकांवर भर
जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत.
सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारणी, खते, काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान, दरातील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठवणूकगृह, रॅपनिंग चेंबर, अत्यल्प खर्चात उपलब्ध असलेले डीहायड्रेशन तंत्र (निर्जलीकरण), दुग्धव्यवसाय सहज व सोपा करण्यासाठी व छोट्या पशूपालकांनाही परवडतील अशी दूध काढणी यंत्र, ‘काऊ कंफर्ट’ तंत्र पहावयास मिळेल. शेततळे,शेडनेट, पॉलिहाऊस, मल्चिंग, गोड्या पाण्यातील मोती संवर्धन यांचे प्रात्यक्षिक तसेच त्यासाठी उपलब्ध शासकीय योजना व बँकांचे अर्थसहाय्य असे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध असेल, अशी माहीती ‘अॅग्रोवर्ल्ड’च्या शैलेंद्र चव्हाण यांनी दिली. याशिवाय,शेती, माती, पाणी, प्रक्रीया व पूरक उद्योग या विषयातील पुस्तकही प्रदर्शनस्थळी असतील. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राज्यातील अकोला, राहुरी व परभणी हे तीन कृषी विद्यापीठ, सहा कृषी विज्ञान केंद्र, आत्मा,पशूसंवर्धन विभाग, मत्स, रेशीम, पणन, वखार महामंडळ या सर्व शासकीय संस्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात विविध शासकीय योजनांची माहीती तसेच त्याबाबतचे प्रात्यक्षिक पहावयास मिळेल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किसनराव मुळे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४
ज. स. सहारिया राज्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान
मुंबई दि. 5- माजी मुख्य सचिव आणि नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज सकाळी स्वीकारला.
नवीन प्रशासन भवनातील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज सकाळी श्री.सहारिया यांचे आगमन झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४
एकनाथ ठाकूर यांच्या निधनाने बँकिंग व्यवसायाचा मानवी चेहरा हरपला --उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
मुंबई, दि.7 :- सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. देशातील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं दिलखुलास व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हापणसारख्या दुर्गम खेड्यात जन्म झालेल्या ठाकूर साहेबांनी गरिबीशी सामना करत स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत नोकरी मिळविली. बँकिंग व्यवसायाशी आलेला हा पहिला संबंध त्यांच्या अखेरपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्रातल्या तरुणांना बँकिंग व्यवसायाची दारं खुली करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगने लाखो तरुणांना बँकिंग व्यवसायात नोकरी मिळवून दिली. नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचं योगदान मोलाचं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने केलेली प्रगती इतर बँकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
गेली तब्बल 42 वर्षे कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचं दर्शन घडवलं. त्यांचं संपूर्ण जीवन महाराष्ट्रीय युवकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या बँकिंग आणि सामाजिक क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४
नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा
नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे.
सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली.
या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही आचार संहिता नवी मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन आणि सिडको यांच्या वेबसाईटवर पहावयास मिळेल.
लवकरच नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकारक्षेत्रात सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांचे चित्रिकरण नवी मुंबई पोलीस मुख्यालयात उपलब्ध राहील.
सोमवार, ७ जुलै, २०१४
नवी मुंबईकरांना टोलचा भार लावणार नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
मुंबई - (प्रतिनिधी) - सायन ते कळंबोली हा दहा पदरी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या रस्त्याचा ९५ टक्के भाग सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. सिडकोच्या उभारणीत येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टोलचा भार नवी मुंबईकरांवर पडू नये, यासाठी आपण आजच्या कॅबिनेट बैठकीत सिडकोतर्फे १२०० कोटी देण्याची मागणी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विष्णूदास भावे नाट्यगृह,वाशी येथे पार पडलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोलनाके आहेत. हे टोलनाके कसे कमी करता येतील, यावरही विचारविमर्श चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. MMRDA, सिडको आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचा समन्वय साधून हे टोलनाके बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच Light Motor Vehicle ला दुचाकी, तीन चाकी आणि एसटीप्रमाणे टोलमधून वगळता येऊ शकते का? याचीही चाचपणी चालू केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
शनिवार, ५ जुलै, २०१४
राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण निरोप
मुंबई दि. 5 (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आज भावपूर्ण निरोप देण्यात आला.
राज्य निवडणूक आयुक्त पदाची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करुन श्रीमती सत्यनारायण आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त आज आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना एका अनौपचारिक समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव, मधुकर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला.
कोणत्याही प्रकारे आपला औपचारिक निरोप समारंभ करु नये अशा प्रकारच्या सूचना श्रीमती सत्यनारायण यांनी आधीच कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी निरोप घेतला आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा आगळावेगळा निरोप समारंभ भाषणाविनाच पार पडला.
शनिवार, २८ जून, २०१४
पारगाव ग्रामस्थांनी दिले नवी मुंबई विमानतळ भूखंडासाठी संमतीपत्र
मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने जाहीर केलेले आणि राज्य शासनाने मंजूरी दिलेले नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि पुन:स्थापना पॅकेज मान्य असून यासंदर्भातील गावांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आणि आपल्या जमिनी सिडकोकडे हस्तांतर करण्यास सहमत असल्याचे पत्र पारगाव ग्रामस्थांनी सिडको व्यवस्थापनाकडे सादर केले.
दिनांक 26 जून 2014 रोजी पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपले सहमतीपत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांचेकडे सुपूर्द केले. या शिष्टमंडळात सरपंच श्रीमती बेबी वाघ, उपसरपंच श्री. संतोष म्हात्रे, सदस्य श्री. विकास पाटील, प्रफुल्ल मेहर, प्रल्हाद नाईक, जागृती कारेकर, वंदना पाटील यांचेसमवेत डॉ. प्रकाश पाटील, बाबूराव पाटील, सदाशिवराव पाटील, भास्कर पाटील, रत्नदीप पाटील, विजय पाटील, सुहास पाटील, सुरेश म्हात्रे, मोहनराव नाईक यांचा समावेश होता.
औरंगाबाद झालर क्षेत्रातून सिडकोची माघार - सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
औरंगाबाद (वि. प्र.) - औरंगाबाद झालर क्षेत्र हे राज्यातील विविध नवीन शहरांपैकी एक असून सिडकोची त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या (मंगळवार 24 जून 2014) बैठकीत औरंगाबाद झालर क्षेत्र नियोजन आणि विकासाची जबाबदारी अन्य प्राधिकरणाकडे सोपवावी याबाबत एकमत झाले. सिडकोला या जबाबदारीतून मुक्त करावे यासाठी शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, प्रधान सचिव, नगरविकास-1 मनुकुमार श्रीवास्तव, जेएनपीटीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एन. एन. कुमार, संचालक नामदेव भगत, वसंत भोईर आणि कंपनी सचिव प्रदीप रथ हे उपस्थित होते.
भूसंपादनास होत असलेला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, पायाभूत सुविधा विकास कर देण्यास नागरिकांचा नकार तसेच विकासाची अंदाजे किंमत आणि विकास कामांवर होणारा खर्च यातील वाढती तफावत या कारणास्तव संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. झालर क्षेत्राच्या आराखड्याबाबत हरकती आणि सूचना मागविण्याच्या तारखेस 3 जुलै 2014 पर्यंत मुदतवाढ द्यावी असेही बैठकीत ठरले.
वाळुज महानगराचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणूनसुद्धा सिडकोवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या नियोजित महानगरातील मूळ जमिनधारकांनी आपल्या जमिनी छोट्या-मोठ्या भूखंडांमध्ये विभागून विकण्यास प्रारंभ केला आहे. या भूखंडांसाठी कुठल्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोने पहिल्या टप्प्यातील विकासात या भूखंडांच्या विक्रीस परवाने देण्याबाबत नियमावली ठरविली. संचालक मंडळाने या नियमावलीस या बैठकीत संमती दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वगळता 8670 हेक्टर क्षेत्र या महानगराकरिता अधिसूचित करण्यात आले आहे. यातील 1730.11 हेक्टर क्षेत्राच्या विकासाच्या आराखड्यास महाराष्ट्र राज्य नगरनियोजन कायद्यान्वये राज्य शासनाने 14-8-2001 रोजी मान्यता दिली आहे. या क्षेत्रातील भूखंडांच्या विक्रीसाठी अंतर्गत रस्त्यांची निर्मिती, जल वाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, पदपथावरील दिवे आणि वृक्षारोपण या पायाभूत सुविधांचा विकास करणे मूळ जमिनधारकास बंधनकारक करण्यात आले आहे. औरंगाबाद आणि वाळुज महानगरातील मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कातही सिडकोने 10% ने वाढ केली आहे. ही वाढ 2014-15 या वर्षाकरता आहे.
सिडकोच्या विकास आराखड्यानुसार वाळुज महानगरामध्ये नगर-1, 2, 3 आणि 4 असे नियोजन करण्यात आले आहे. वाळुज महानगरातील 6939.89 हेक्टर परिसर नागरीकरण अयोग्य क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील नगर-3 चा परिसर नागरीकरण अयोग्य क्षेत्रात मोडत असल्याकारणाने नगर नियोजनातून वगळण्यात यावा असा निर्णयही घेण्यात आला आहे. हा परिसर औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करावा असा निर्णयही घेण्यात आला. नागपूर घोटी एक्सप्रेस हायवे हा नवा रस्ता वाळुज महानगराच्या नजीक असल्याकारणाने या पट्ट्यात नगर-5 आणि नगर-6 यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने आराखडा सिडकोने तयार केला असून संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली. हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळ प्रभावीत क्षेत्र अर्थात नैनाच्या धर्तीवर विकसित करण्याची योजना सिडकोने आखली आहे.
नैना क्षेत्रातील विकास करांची पुनर्रचना करण्यात यावी या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव लवकरच शासनास सादर केला जाणार आहे. संचालक मंडळाने आणखी काही महत्वाच्या प्रस्तावांनाही मान्यता दिली.
नवी मुंबईतील तळोजा रेल्वे स्थानकावरून मेट्रो रेल्वे जाणार असल्याने मेट्रोच्या व्हायडक्टच्या कामास मध्य रेल्वेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत या समस्येवर मार्ग काढण्यासाठी बोलणी केली. मध्य रेल्वेने सुचविलेल्या केबल पुलाचा प्रस्ताव सिडकोने या बैठकीत मान्य केला.
नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकार क्षेत्रातील सर्व नोडमधील तसेच नोड व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील आरक्षित मूल्याच्या पुनर्रचनेत बदल करावयाच्या प्रकल्प अहवालासही संचालक मंडळाने मान्यता दिली. हे मूल्य 31-3-2014 पर्यंत लागू होते. आरक्षित मूल्यात 12.5% नी वाढ झाल्यामुळे पुनर्रचना करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
रविवार, २२ जून, २०१४
94 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान - २३ जून ला मतमोजणी
मुंबई दि. 22 : राज्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 77 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते सप्टेंबर, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम दि. 26 मे, 2014 रोजी जाहीर केला होता. यापैकी 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर 94 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले.
उद्या दि. 23 जून रोजी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.
शनिवार, २६ एप्रिल, २०१४
बाळू उर्फ अंकुश खाडे यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलावंत हरपला: अजित पवार
मुंबई, दि. 26: ज्येष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश खाडे यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, बाळू-काळू यांची जोडी म्हणजे लोककलेच्या क्षेत्रातील एक मोठे आकर्षण होते. लोककलेच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ही जोडी म्हणजे अनेक यात्रा-जत्रांचेही महत्वाचे आकर्षण असायची. विविध वगनाट्यांमध्ये बाळू यांनी केलेल्या भूमिका खूपच गाजल्या. बाळू यांच्या भूमिका कायमस्वरुपी रसिकांच्या ह्रदयावर कोरल्या गेल्या आहेत. वगनाट्यांद्वारे त्यांनी अंद्धश्रद्धा आणि अस्पृश्यतेसारखे प्रश्न हाताळून सामाजिक समतेचा आणि न्यायाचा संदेश देण्याचेही काम केले आहे. शिक्षणाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदतही केली आहे. त्यांनी अनेक संस्थांसाठी मोफत कार्यक्रमही केले आहेत. त्यातून त्यांनी सामाजिक भान जोपासण्याचे आणि वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य कायस्वरुपी आपल्या स्मरणात राहील.
शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४
शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील निर्णयाने माता-भगिनींचे जीवन सुरक्षित होण्यास मदत -- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 4 :- मुंबईच्या शक्ती मिल परिसरातील सामुहिक बलात्कार खटल्यातील तीन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा न्यायालयाचा निर्णय दूरगामी आणि विधायक परिणाम करणारा असून या निर्णयाने समाजात योग्य संदेश पोहचला आहे. यापुढे बलात्कारासारखे दुष्कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही आणि भविष्यात आपल्या माता, भगिनींचे जीवन सुरक्षित करण्यात हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर शासनाने बलात्कारासंदर्भातील कायदा अधिक कडक करुन ३७६ (ई) कलमाची तरतूद केली. या तरतुदीने बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कलमाचा वापर पहिल्यांदा आपल्या राज्यात करावा लागावा हे दुर्दैवी असले तरी यापुढे असा गुन्हा करण्यास कुणी धजावू नये आणि या कायद्याचा वापर करण्याची वेळ देशात कुठेही येऊ नये, अशा पद्धतीचे निकोप वातावरण निर्माण झाले पाहिजे.न्यायालयाचा आजचा निर्णय महिलांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रांतीकारी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच या खटल्यासंदर्भातील पुढील न्यायालयीन प्रक्रियाही वेगाने पूर्ण होईल, असा आशावादही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
बुधवार, १२ मार्च, २०१४
मुख्यमंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी
मुंबई, दि. 11 मार्च 2014: मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे आणि पुनर्वसनमंत्री श्री पतंगराव कदम यांनी दि. 11 मार्च 2014 रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानाचा आढावा घेतला.
या दौ-यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी व कनबस येथे नुकसान झालेली द्राक्ष, केळी व पपईची बाग, तसेच गहू, हरबरा व ज्वारीच्या शेतावर जाऊन शेतक-यांच्या हानीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री श्री चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री ठाकरे आणि पुनर्वसनमंत्री श्री कदम यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे पपई बाग, गहू, हरबरा, ज्वारीचे पीक आणि वादळामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. तीनही नेत्यांनी मंगरूळ येथे ग्रामस्थांशी चर्चा केली व मदतीसंदर्भात त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
या नेत्यांनी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लामजाना येथे द्राक्षबाग व इतर पिकांची पाहणी करून शेतक-यांच्या नुकसानाचा आढावा घेतला. किल्लारी येथे शेतकरी व नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. पीडितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे नैसर्गिक संकट मोठे असले तरी शेतक-यांनी चिंता करू नये; महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल, या आश्वासक शब्दात धीर दिला.
सायंकाळी त्यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील आन्वीचा दौरा केला. या ठिकाणी त्यांनी मोसंबी बाग, कांदा, गहू, ज्वारी व इतर पिकांची पाहणी केली. याठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांनी गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली.
रविवार, ९ मार्च, २०१४
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये हिंगोली-रायगड मतदारसंघांची अदलाबदल- हातकणंगलेमध्येही काँग्रेसचा उमेदवार लढणार
मुंबई, दि. 8 मार्च 2014:
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली व रायगड लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 मध्ये काँग्रेसने लढवलेली रायगडची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून, राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली हिंगोलीची जागा काँग्रेस लढवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दि. 8 मार्च 2014 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार आणि मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठकीत दोनही पक्षांच्या संमतीने वरील निर्णय घेण्यात आले आहेत.
या निर्णयानंतर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 27 मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेस 21 मतदारसंघ लढवेल.
सोमवार, ३ मार्च, २०१४
काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी 5 व 6 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर
मुंबई, दि. 3 मार्च 2014:
काँग्रेस उपाध्यक्ष खा.श्री राहुल गांधी दि. 5 व 6 मार्च 2014 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येणार आहेत.
प्रस्तावित दौ-यानुसार खा. राहुल गांधी दि. 5 मार्च 2014 रोजी सकाळी 10 वाजता धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आदिवासी भागातील अभियांत्रिकी व पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11.30 वाजता ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते दुपारी 2 वाजता धुळे ते शिरपूर मार्गावर जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
दौ-याच्या दुस-या दिवशी दि. 6 मार्च 2014 रोजी सकाळी 11 वाजता राहुल गांधी वर्सोवा बीच येथे कोळी बांधवांशी चर्चा करतील. दुपारी 12.30 वाजता ते सोनाले गाव, भिवंडी बायपास येथे कोकण विभागीय जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री मोहन प्रकाशजी, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आ.श्री बाला बच्चन आणि श्री श्योराज जीवन वाल्मिकी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते या दौ-यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४
564 ग्रामपंचायतींच्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई दि. 16 – एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा, उल्हासनगर, सोलापूर, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा तसेच जामनेर, अकोले, अक्कलकुवा, अहमदपूर आणि पोंभुर्णा या पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत राज्यातील 22 जिल्ह्यातील एकूण 564 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.
या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवार दि. 4 मार्च ते शनिवार दि. 8 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 10 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 12 मार्च 2014 हा असेल.
नगरपरिषद निवडणुकांसाठी शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी ते शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून शनिवार, दि. 1 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे सोमवार दि. 10 मार्च 2014 हा व अपिल असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी असेल.
उल्हासनगर, सोलापूर, व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका प्रभागातील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी व ठाणे महानगरपालिकेच्या 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 25 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 4 मार्च 2014 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. बुधवार, दि. 5 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक शुक्रवार दि. 7 मार्च 2014 हा असेल.
जामनेर (जि. जळगाव), अकोले (जि.अहमदनगर), अक्कलकुवा (जि.नंदूरबार), अहमदपूर (जि.लातूर) आणि पोंभुर्णा (जि.चंद्रपूर) या पंचायत समित्यांमधील प्रत्येकी एका निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. 3 मार्च ते शुक्रवार दि. 7 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येणार असून शनिवार, दि. 8 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे गुरुवार दि. 13 मार्च 2014 तर अपिल आहे तेथे मंगळवार दि. 18 मार्च, 2014 हा असेल.
सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका होणाऱ्या वरील सर्व ठिकाणी रविवार दि. 23 मार्च, 2014 रोजी मतदान घेण्यात येणार असून सोमवार दि.24 मार्च, 2014 रोजी मतमोजणी होईल. यासर्व निवडणुकांच्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणुका असलेल्या ठिकाणी संबंधित प्रभागामध्ये आज रात्रौ 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व ती निवडणुकांचा निकाल जाहिर होण्याच्या दिनांकापर्यंत अस्तित्वात राहील असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धा- जळगाव, परभणी विद्यापीठांचे संघ स्पर्धेबाहेर
कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल पुरूष गटाच्या स्पर्धेमध्ये आज बाद फेरीच्या सामन्यांत गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (अजमेर), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ (सूरत), पॅसिफिक विद्यापीठ (उदयपूर) आणि मोहनलाल सुकादिया विद्यापीठ (उदयपूर) यांच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या जळगाव आणि परभणीच्या संघांनी चुरशीची लढत देऊनही पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर पडावे लागले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), महारामा प्रताप विद्यापीठ (उदयपूर) आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ (नाडियाद) या संघांनी उपस्थिती न दर्शविल्यामुळे अनुक्रमे चारोतार विद्यापीठ (चुंग, जि. आणंद), जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ (उदयपूर) आणि सरदार पटेल विद्यापीठ (वल्लभ वैद्यनगर) यांना पुढे चाल देण्यात आली.
अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २५-१९, २५-१९, १२-२५, १६-२५, १५-१० असा ३-२ ने पराभव केला. जळगावच्या संघाने अत्यंत चिवट झुंज दिली.
राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३-२५, १४-२५, २५-१४, २५-१७, १५-१२ असा ३-२ ने पराभव केला. पिछाडीवरून जोरदार मुसंडी घेत राजस्थान विद्यापीठाने सामन्यावर वर्चस्व मिळवले आणि अखेरचे तीन सेट सलग जिंकत सामना जिंकला
.
सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या संघाने बिकानेरच्या महाराजा गंगासिंह विद्यापीठाचा २५-१८, २५-१०, २५-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उदयपूरच्या पॅसिफिक विद्यापीठाने गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन संघाचा २५-८, २५-१६, २५-१२ असा सहज पराभव केला तर उदयपूरच्याच मोहनलाल सुकादिया विद्यापीठानेही जयपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठाचा २५-१५, २५-२०, २५-१६ असा पराभव केला.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन
कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: राष्ट्रीय व राज्य स्तरावर क्रीडा संघटनांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी युवा खेळाडूंकडूनही सहकार्य आणि प्रयत्नांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू संजय नाईक यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धेचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन.जे. पवार अध्यक्षस्थानी; तर प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. एस.एस. हुंसवाडकर, शांताराम माळी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सूर्यवंशी, रेफ्री मंडळाचे समन्वयक डॉ. सुनील चव्हाण, पी.एस. पंत आणि अतुल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे प्रादेशिक सचिव असलेले श्री. संजय नाईक म्हणाले, खेळामध्ये राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती शिरल्यामुळे मूळ खेळ आणि खेळाडू या दोहोंवर त्याचा विपरित परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन व्हॉलीबॉल संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंची निवड पारदर्शकपणे करण्यावर भर दिला असून १४ ते २१ वयोगटातील संघनिवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. वरिष्ठ वयोगटातील निवडही त्याच धर्तीवर करण्यात येईल. क्रीडापटूंना विशेषतः व्हॉलीबॉल खेळाडूंना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याबाबतही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सन १९८३-८४मध्ये अमरावती विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघामधून शिवाजी विद्यापीठात खेळाडू म्हणून आल्याच्या आठवणीलाही श्री. नाईक यांनी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांनी निकोप स्पर्धेचा आनंद लुटावा आणि कोल्हापुरातून परत जात असताना चांगल्या आठवणींचा ठेवा आपल्यासोबत न्यावा, असे आवाहन केले. सुवर्णमहोत्सवी शिवाजी विद्यापीठात अनेक चांगले विभाग, संग्रहालये आहेत; परिसरात उत्तम जैवविविधता आहे, त्यांची पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संजय नाईक यांच्या हस्ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या ध्वज तर कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. यजमान शिवाजी विद्यापीठ संघाचा कप्तान दिग्विजय साळुंखे याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
यावेळी कुलसचिव डॉ. डीव्ही. मुळे यांनी स्वागत केले. क्रीडा विभागप्रमुख पी.टी. गायकवाड यांनी आभार मानले. सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४
Anand Mahindra accepts Sustainable Development Leadership Award
February 06, 2014, New Delhi: Mr. Anand Mahindra, Chairman of the USD 16.7 billion Mahindra Group, today received the Sustainable Development Leadership Award from The Energy and Resources Institute (TERI). Mr. Mahindra accepted the award from External Affairs Minister, Mr. Salman Khurshid on behalf of the Mahindra Group, at a special ceremony held in the National Capital.
Mr. Mahindra was presented with the award in recognition of the dynamic and visionary leadership he has shown in spearheading the Mahindra Group on the path of sustainability and environmental awareness.
“With its dynamic and visionary approach, TERI has greatly contributed to the global dialogue on finding solutions to global problems in the fields of energy, environment and sustainable development and I am honoured to accept this award from them on behalf of the Mahindra Group,” said Mr. Anand Mahindra, Chairman, Mahindra Group.
Instituted by TERI in 2005, the Sustainable Development Leadership Award felicitates global leaders for their contributions to the field of sustainable development. The Award is presented at the Delhi Sustainable Development Summit as TERI’s tribute to eminent individuals engaged in encouraging global initiatives that can lead the world towards a sustainable future.
Past recipients of the award include Mr. Yukio Hatoyama, Prime Minister of Japan, Dr. Manmohan Singh, Prime Minister of India, Mr Ban Ki-moon, Secretary-General of the United Nations, Mr Arnold Schwarzenegger, Governor of California, Mr. Shoichiro Toyoda, Honorary Chairman of Toyota Motor Corporation, amongst others.
The annual Delhi Sustainable Development Summit (DSDS) is a major event focusing on sustainable development, the pursuit of the Millennium Development Goals (MDGs) and assessment of worldwide progress in these critical areas. DSDS attracts the most prominent thinkers and practitioners in a range of fields that impinge on development. Since development worldwide is moving towards an architecture based on partnerships, the leaders who participate in DSDS come from government, business and industry, multilateral and bilateral organizations, research and academia and civil society.
In keeping with its focus on harnessing the technological advancements in green technology and deploy the same towards betterment of the overall automotive eco-system, Mahindra has its green product portfolio on display at the Auto Expo currently underway in Greater Noida. Mr. Mahindra also unveiled the Mahindra Formula-E Car, which will participate in the FIA sponsored Formula-E Championship starting in September 2014. The Mahindra Group, besides being the only Indian team to participate in the Formula-E, hopes to integrate its advanced operations and expertise in electronics, IT, automotive technologies and manufacturing into the global electric vehicle growth story.
The Formula-E is a new FIA Championship featuring Formula Cars powered solely by electricity. It is expected to serve as a critical platform for research and development into future sustainable electric vehicles.
Ads powered by TrulyShare
गुरुवार, ३० जानेवारी, २०१४
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी
विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले.
अर्हता विनंती निविदेच्या दस्ताऐवजास केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून आता या संदर्भातील निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी जागतिक निविदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस 90 दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून त्यानुसार प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र संस्थांची यादी जाहीर करण्यात येईल. तद्नंतर स्वारस्य अभिव्यक्ती निविदा मागविण्यात येतील. या प्रक्रियेअंती नवी मुंबई विमानतळाच्या विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदार निवडला जाईल. ज्यांच्यामार्फत विमानतळ विकासाचे कार्य सुरू करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेस 9-10 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. सार्वजनिक खाजगी भागीदाराच्या निवडीनंतर लवकरच विकास कामास सुरूवात करण्यात येईल.
विमानतळाकरिता आवश्यक जमीनीच्या भूसंपादनसंदर्भातील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व भूधारकांची सहमती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. हिंदुराव यांनी सांगितले. मूळ विमानतळ प्रकल्पाकरिता 1160 हेक्टर जमीनीची आवश्यकता असून त्यापैकी 292 हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. विमानतळ आणि संलग्न विकास क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 2268 हेक्टर असून त्यापैकी 75 टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. उर्वरीत 25 टक्के जमीनीचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. या जमीनीचे संपादन भूधारकांच्या सहमतीनेच करण्यात येणार आहे.
विमानतळ क्षेत्रातील जमीन विकासासंदर्भातील 50 टक्के कामे प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्यात येणार असून सद्यस्थितीत पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या पुष्पक नगरीतील जमीन विकासासाठी 300 कोटी रूपये किंमतीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विमानतळाकरिता संपादित केलेल्या जमीनीच्या बदल्यात पुष्पक नगर येथे 22.5 टक्के जमीन देण्यात येणार आहे. राहत्या घरांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी वडघर आणि वहाळ येथील क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे अशीही माहिती श्री. हिंदुराव यांनी दिली.
सोमवार, २७ जानेवारी, २०१४
प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल 2 नवे चिटणीस व 8 जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्त्या
मुंबई, दि. 27 जानेवारी 2014: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी संघटनेमध्ये अनेक फेरबदल केले आहेत.
नव्या फेरबदलांमध्ये नागपूरचे श्री जयप्रकाश गुप्ता आणि जळगावचे श्री सलिम पटेल यांची प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील 8 जिल्हा काँग्रेस कमिटींचे नवे अध्यक्ष नेमले आहेत. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री विकास ठाकरे, चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश देवतळे, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.श्री अर्जून भंगाळे, जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अॅड. श्री संदीप पाटील, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती आश्विनी बोरस्ते, अकोला जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री हिदायत पटेल, सांगली जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री मोहनराव कदम तर बीड जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री सर्जेराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील आणखी काही जिल्हाध्यक्ष येत्या 3-4 दिवसात बदलण्यात येणार असून, प्रदेश पदाधिकारीपदी काही नवीन नियुक्त्यासुद्धा केल्या जाणार आहेत.
मंगळवार, २१ जानेवारी, २०१४
वीज दर कपातीबाबत काँग्रेसच्या मागणीला राज्य सरकारची मंजुरी- प्रदेश काँग्रेसने केले निर्णयाचे स्वागत
मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: वीज दरांमध्ये कपात करण्याच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, या निर्णयाचे प्रदेश काँग्रेसने स्वागत केले आहे.
सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राकडून विजेचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विजेच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वीज दरात सरसकट 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.
वीज दरांचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्यातील वीज ग्राहकांच्या मागणीला अनुकूल भूमिका घेऊन दर कमी करण्याबाबत शिफारस केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने सरदहू निर्णय घेतला आहे. दरकपातीच्या निर्णयासाठी राज्य सरकारला सुमारे 7200 कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील दर कपातीप्रमाणेच मुंबई महानगरातही वीजेचे दर कमी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. राज्यातील शेतकरी नुकतेच कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे कनेक्शन्स थकबाकीसाठी तोडली जाऊ नये, असेही प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.
राज्यातील बहुतांश काँग्रेस उमेदवारांची घोषणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात
मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पातळीवरील पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची मोठी संख्या असेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.
दि. 20 जानेवारी 2014 रोजी टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे सदस्य मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.श्री गुरूदास कामत, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.श्री जनार्दन चांदूरकर, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण, वनमंत्री श्री पतंगराव कदम, श्री सुरूपसिंग नाईक, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ.श्री राजीव सातव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष आ.श्री जयप्रकाश छाजेड, एनएसयुआयचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ.श्री माणिकराव ठाकरे म्हणाले की, या बैठकीत राज्यातील सर्वच्या 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे व परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. परंतु, काँग्रेसने नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन समोर जाण्याची काँग्रेसची भूमिका घेतली आहे व ती आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढण्यास प्रदेश काँग्रेसचे निवड मंडळ अनुकूल आहे. विविध पक्षांसोबत आघाडीचा निर्णय घेणा-या संरक्षण मंत्री श्री ए. के. अॅन्थनी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील समितीकडे तसा अहवाल देखील रवाना करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरून बोलणी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर लगेच उपरोक्त समविचारी पक्षांशी जागावाटपाची बोलणी केली जाईल, असेही आ.श्री ठाकरे म्हणाले.
बुधवार, १५ जानेवारी, २०१४
सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प या नव्या गृहसंकुलाच्या योजनापुस्तिकेची विक्री 16 जानेवारीपासून सुरु
नवी मुंबई (खारघर)दि. १५ - महाराष्ट्रातील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे सिडको पुन्हा एकदा व्हॅलीशिल्प हा भव्य गृहप्रकल्प घेऊन येत आहे. नवी मुंबई, खारघर, सेक्टर 36 मध्ये साकारलेला हा गृहप्रकल्प 16 जानेवारी 2014 पासून लोकांसाठी खुला होत आहे.
या प्रकल्पासाठीचे अर्ज 16 जानेवारी ते 5 फेबुवारी 2014 या काळात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत तर शनिवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे अर्ज उपलब्ध होणार नाहीत. व्हॅलीशिल्पच्या अर्जाची किंमत रुपये 500/- (+ रु. 25/- वॅट) एवढी असेल. हे अर्ज, तळ मजला, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तिसरा मजला,
पणन विभाग-2, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, अकरावा मजला, निर्मल, नरिमन पाँईट,
मुंबई, टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा या ठिकाणी उपलब्ध होतील.
अर्जदारांनी नोंदणी शुल्काच्या रकमेचा सिडको लिमिटेडच्या नावे काढलेला व नवी मुंबई येथे देय असलेल्या डीडी अथवा पे ऑर्डर सहीत अर्ज 20 फेबुवारी 2014 पर्यंत टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत सादर करावा. कुरीअर अथवा पोस्टाने पाठवलेले अर्ज गाह्य धरले जाणार नाही.
या गृहसंकुलासाठी सिडकोने पात्रतेचे काही निकष ठेवले आहेत. अर्जदाराचे कौटुंबिक मासिक उत्पन्न 62,000/- रुपये पर्यंत असेल तर त्यांना मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकेसाठी अर्ज करता येईल. उच्च उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा नाही. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कमीतकमी 15 वर्षांचा रहिवासी असावा, तसेच अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाचेही नवी मुंबईत घर नसावे.
शासनाच्या आरक्षण धोरणानुसार या गृहसंकुलात विविध प्रवर्गांसाठी काही सदनिका राखीव असतील. त्याचबरोबर सिडको यावेळी प्रथमच विशेष प्रवर्गांसाठी राखीव कोट्यातील काही सदनिका उपलब्ध करुन देणार आहेत. त्यात महाराष्ट्र विधानसभा/परिषदचे विद्यमान सदस्य, नवी मुंबईतले पत्रकार तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त यांचा समावेश आहे.
व्हॅलीशिल्प हे 6.45 हेक्टरच्या विस्तीर्ण भूखंडावर साकारण्यात आलेलं निसर्गाच्या सान्निध्यातलं आणि आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त असं भव्य गृहसंकुल आहे. यात मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी मिळून एकूण 1224 सदनिका आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी 802 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1015.42 + 55.58 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 609 + 45.19 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 49 ते 60 लाख रुपये एवढी आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 422 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1515.76 + 58.96 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 1024.56 + 58.18 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 96 लाख ते 1.07 कोटी रुपये एवढी आहे.
व्हॅलीशिल्पमध्ये उत्तमोत्तम आणि आधुनिक सुविधा देण्याचा सिडकोने पूरेपूर प्रयत्न केला आहे. यात दोन उद्वाहकांसहित वातानुकुलित क्लब हाऊस, सर्व आधुनिक सोयींनीयुक्त फिटनेस सेंटर (टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, टेबल टेनिस, स्नूकर, चेस, कॅरम इ.), जॉगिंग ट्रॅक, स्नेहसंमेलनांसाठी आणि कार्यकमांसाठी सभागृह, लहान मुलांसाठी खेळांसह बगीचे, मैदाने, पाळणाघर, लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी जलतरण तलाव, बहुस्तरीय वाहनतळ आदी सुविधा आहेत.
घराच्या अंतर्गत सुविधांबाबतीत सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. घराचा मुख्य दरवाजा अग्नी रोधक असून फेम्स आणि फिटिंग्सने परिपूर्ण आहे तर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.
उत्तम प्रकल्प स्थळामुळे हे गृहसंकुल नवी मुंबईत लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री वाटते. हा गृहप्रकल्प प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो स्थानकापासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोयीच्या वाहतुकीने जोडलेला आहे. प्रसिध्द सेन्ट्रल पार्क आणि गोल्फ कोर्स केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर तर खारघर रेल्वे स्थानक 7 किमी अंतरावर आहे. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक आदी सर्व सुविधा संकुलाच्या अगदी जवळ आहेत तर पांडवकडा धबधबा हे प्रसिध्द पर्यटनस्थळ केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
नवी मुंबई मध्ये स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचे स्वप्न व्हॅलीशिल्पच्या माध्यमातून साकार होईल याची सिडकोला खात्री आहे. ज्यांना या प्रकल्पाचा एक भाग होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रकल्पस्थळी सॅम्पल फ्लॅट अवलोकनार्थ उपलब्ध आहे. सिडकोने या पूर्वीही उन्नती, वास्तुविहार, सेलिबेशन्स, स्पॅगेटी तसेच सीवूडस इस्टेटच्या माध्यमातून अनेकांना आपले घराचं स्वप्न साकार करण्याची संधी दिली आहे आणि सिडको कायमच या कामाप्रती बांधील राहील.
सोमवार, १३ जानेवारी, २०१४
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाई समस्या तीव्र - संच क्र. ५ बंद
मुंबई, ता. १३ - महानिर्मितीच्या ११३० मेगावॉट क्षमतेच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाईची समस्या तीव्र झाली असून सध्या जेमतेम सरासरी १ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या संच क्र. ५ बंद करण्यात आला असून अन्य संच देखील पुरेशा कोळशाअभावी पूर्ण क्षणतेनेचालविता येत नाहीत.
परळी औष्णिक विद्युत केंद्रास कोळसा पुरवठा करणार्या मे. एम.सी.एल., मे. एस.ई.सी.एल., मे. डब्ल्यू.सी.एल. या सर्व कोळसा कंपन्यांशी पुरेसा कोळसा मिळण्यासाठी महानिर्मितीचा सातत्याने पुरवठा सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी सुमारे ६ महिन्यांहून अधिक काळ परळी औष्णिक विद्युत केंद्र पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने बंद ठेवावे लागले होते. असे महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी कळविले आहे.
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने महान उद्योजक हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवसायातील कारागिर आणि कामगारांच्या श्रमांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे आपल्या यशाचं श्रेय त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच यशात सहभागी करुन घेतलं, यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
माणसं जोडणं, संघटना बांधणं, लोकांच्या हक्कांसाठी लढणं, संकटांच्या-अडचणींच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं या आपल्या स्वभावगुणांमुळे त्यांनी पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. पुणेकरांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. अनेक मानसन्मानांनी त्यांचा गौरव केला. दाजीकाकांनी त्यांच्या पत्नी कमलाबाईंच्या निधनानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने न उतरवता ते वैकुंठधामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच ठेवून देण्याचा निर्णय घेतला होता. लातूर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भरीव निधी उभारण्यातही त्यांचा पुढाकार होता. अशा अनेक घटनांमधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी सिद्ध करुन दाखवली. त्यांच्यासारखा उद्योजक आणि उमद्या मनाचा माणूस निघून जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
गुरुवार, ९ जानेवारी, २०१४
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्यांचा भरती प्रक्रियेत विचार करणे बंधनकारक - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 7: शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांनी भरती प्रक्रिया राबविताना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाही विचार करणे कायद्याने बंधनकारक आहे; तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपले वार्षिक वित्तीय अंदाजपत्रक सादर करताना त्यात ‘रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती बजेटचा समावेश करणे अनिवार्य केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाचे मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विधिमंडळ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष तथा रोजगार व स्वयंरोजगार राज्यमंत्री संजय सावकारे, समितीचे सदस्य श्री.सुधीर मुनगंटीवार, श्री. सुरेश हाळवणकर, श्री. विनायक मेटे, डॉ. सुधीर तांबे, प्रा. सुरेश नवले, डॉ. दीपक सावंत, वित्त विभागाचे सचिव राजेश अगरवाल, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाचे आयुक्त विजय कुमार गौतम आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या वेळी प्राधान्य देणे खासगीसह सर्वच आस्थापनांना बंधनकारक आहे. त्यासंदर्भातला विशेष कायदा अस्तित्वात आहे. त्याचे उलंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या कायद्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेत केवळ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाच समावेश करावा, असा आग्रह नाही; परंतु इतर उमेदवारांबरोबरच याही उमेदवारांचा विचार झाला पाहिजे. सर्वांसाठीच परीक्षा किंवा चाळणी प्रक्रिया राबवून पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करावी. याबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
कृषी प्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाईल, बँकिंग, वित्त आणि विमा, बांधकाम, आरोग्य, माहितीतंत्रज्ञान, रिटेल, फार्मासिटिकल आणि केमिकल, वस्त्रोद्योग आदी निवडक 11 क्षेत्रांमध्येसन 2022 पर्यंत 5 कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. शिवाय राज्यात 15 ते 44 वयोगटातील लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, अशी माहिती श्री. गौतम यांनी दिली. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपल्या वार्षिकवित्तीय अंदाजपत्रकात ‘रोजगार स्वयंरोजगार निर्मितीब जेट’ या घटकाचा समावेश करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात येतील. त्याचबरोबर राज्याच्या उद्योग, पर्यंटन, महिला व बालविकास, क्रीडा, शिक्षण आदी धोरणांमध्येही रोजगार, व स्वयंरोजगारनिर्मिती च्या तपशिलाचा; तसेच त्याबाबतचे नियोजन, कार्यवाही आणि कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील. त्याचबरोबर बेरोजगारी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.रोजगार व स्वयंरोजगार विभागाने बेरोजगारी दूर करण्यासाठी नव्या संकेतस्थळासह विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची संख्या, रोजगारांची उपलब्धता, उपलब्ध झालेले रोजगार आदींची अद्ययावत माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. बेरोजगारांची आता सेवाकेंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही नोंदणी करता येते. त्यामुळे सेवा योजन कार्यालयात रांगा लावण्याची आश्यकता नाही.
सादरीकरणातील ठळक मुद्दे व निर्णय:-
• बेरोजगारांची कौशल्यक्षमता चाचणी घेऊन गरजेनुसार प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे ‘व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रांमध्ये रुपांतर करणार.
• राज्यातील निवडक 5 जिल्ह्यांमध्ये पथदर्शी योजने अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
• बेरोजगार उमेदवारांना रोजगारानुरुप कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्कील व्हाउचर्स योजना’ राबविणार.
• राज्यात खाजगी प्लेसमेंट एजन्सीच्या कामकाजाचे नियमन करण्यासाठी कायदा करण्या संदर्भात कार्यवाही करणार.
• अनुसूचित जातीजमातीच्या उमेदवारांसाठीच्या ‘स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजने’त सुधारणा करणार.
• रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी करिअर ग्रंथालय व अभ्यासिका योजनेस आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
• बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना विनानिविदा 5 लाख रुपयांपर्यंत ची कामे देण्याची मर्यादा वाढवून देण्यात येईल.
• रोजगार नोंदणी आणि विविध आस्थापनांना पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे www.maharojgar.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४
Makar Sankranti Mela at CIDCO Urban Haat - Belapur
BELAPUR - Makar Sankranti a major harvest festival celebrated in India is here. It is known and celebrated by different customs in different parts of the country. The festival in southern parts of India is celebrated as Pongal whereas in Punjab as Maghi. Since Makar Sankranti is celebrated for innumerable reasons and in innumerable ways CIDCO Urban Haat also gives you a reason to celebrate this auspicious festival from 3rd to 19th January, 2014 at CIDCO Urban Haat near CBD Belapur Railway Station.
In this grand Sankrant Mela, artisans from West Bengal, Maharashtra, Assam, Tripura, Rajasthan, U.P, Tamil Nadu, Gujarat, Punjab, Jammu & Kashmir and Bihar are participating with exclusive handloom and Handicraft products. In handicrafts terracotta, leather products, jute products, bamboo products, wall hangings, artificial jewellery, stone arts, paintings, bangles, carpets, statues will be exhibited by master craftsmen from various states of Maharashtra.
Apart from handloom and handicraft articles, Urban Haat this time has come up with an exclusive food court for the food lovers. There will be a special display of Konkan food products from Sindhudurg, Kolhapur, Raigarh and Ratnagiri by the Self Help Groups, wherein one can enjoy delicious Kolhapuri, Malvani and Sea food items all under one roof.
Makar Sankrant Mela will start with a huge ovation this New Year at Urban Haat. CIDCO has proposed many events like Gandhi Shilp Bazaar, National Handloom Expo, Vasant Mela, Chaitra Mela and Summer Festival at the Haat till June 2014. The calendar of event for the same is ready.
Many cultural programmes are held in the amphitheatre in the weekends. Some of the programmes scheduled are fashion designing shows, Film Festivals, Dance, Drama, Orchestra and many other cultural activities by schools and colleges of Navi Mumbai. So, don’t forget to participate in the upcoming cultural programs organized at the Haat.
If any colleges, schools, NGO's, cultural organizations are interested for organizing cultural activities in the amphitheatre of CIDCO Urban Haat they can contact Manager CIDCO Urban Haat for booking and further details. Urban Haat now days, is becoming ever permanent Haat for genuine rural Indian craftsmen to display their special handloom & handicraft products directly to the citizens of Navi Mumbai.
बुधवार, १ जानेवारी, २०१४
धुळे शहरातील रस्ते आणि रुग्णालयांसाठी महापालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान
मुंबई, दि.1 : धुळे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
धुळे महानगरपालिकेला अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, वित्त विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.
धुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन 80 फुटी रोड येथे मॅटर्निटी होम; तर चक्करबर्डी परिसरात सार्वजनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच धुळे शहरातील विविध मुख्य रस्ते तयार करण्यासाठी 10 कोटी रुपयांची गरज आहे. असे एकूण 20 कोटी रुपये महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी श्री. कदमबांडे यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लहान महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन शहरांच्या विकासाला गदी देण्यावर शासनाचा भर आहे. धुळ्यातील नागरी सुविधांची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामांसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल.सांगली महानगरपालिकेला दिलेल्या अनुदानाच्या धर्तीवर हा निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल. त्यात नगरविकास राज्यमंत्री श्री. सामंत स्वत: लक्ष घालतील.अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था झालेल्या रस्त्यांची कामे या अनुदानातूनप्राधान्याने करावीत; तसेच सर्व कामे दर्जेदारच झाली पाहिजेत.
विकास आराखडा सादर करावा
धुळे महानगरपालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनशहराचा विकास आराखडा शासनास सादर करावा. शहराच्या आवश्यकतेनुसार आराखड्यात उद्याने, क्रीडांगणे, शाळांच्या जागा, वीज उपकेंद्रांच्या जागा आदींच्या योग्य त्या आरक्षणांचा त्यात समावेश असावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
गळती रोखल्यास भारनियमन बंद करणार
धुळे शहरातील यंत्रमागधारकांची गैरसोय टाळण्यासाठी भारनियमन कमी करण्यात यावे; तसेच यंत्रमागधारकांना वीज दरात सवलत देण्यात यावी, अशी मागणी धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोशिएशनने केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात विजेची पुरेशी उपलब्धता आहे. परंतु अधिक गळती असलेल्या भागातच भारनियमन केले जाते. आपल्या असोशिएशनने आणि धुळ्यातील इतर नागरिकांनी गळती रोखण्यासाठी सहकार्य केल्यास केवळ भारनियमन कमीच नाही तर ते पूर्णत: बंद केले जाईल. तुमची तयारी असल्यास आम्ही 15 दिवसांत भारनियमन बंद करु शकतो.
उपमुख्यमंत्र्यांची ही सूचना धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोशिएशनने मान्य केल्याने शहरातील गळती कमी झाल्यानंतर लगेच भारनियमन बंद केले जाईल. कबीरगंज, वळजाई रोड आणि मोहाडी फिडरमध्ये यंत्रमागधारकांची असलेली संख्या लक्षात घेऊन तिथे प्राधान्याने ही उपयायोजना केली जाईल, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील यंत्रमागधारकांना आपण वीजबिलांत जवळपास 1100 कोटी रुपयांची सवलत देतो. त्यात आणखी वाढ करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नवनिर्वाचित महापौर जयश्री अहिरराव आणि धुळे पंचायत समितीच्या सभापती ज्ञानज्योती भदाणे यांचा यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.माजी उपमहापौर सव्वाल अन्सारी, म्हाडाचे नाशिक विभागीय माजी सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, नगरसेवक चंद्रकांत केले, मनोहर भदाणे आदी यावेळी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
