शासनाने भारतातून केली जाणारी कांद्याची निर्यात तूर्त थांबविली आहे. सद्य परिस्थितीत उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आणि स्तुत्य आहे.
अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा, द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गुदामांमध्ये साठविलेला कांदा अक्षरशः सडल्यामुळे फेकून द्यावा लागला. यातही, जीवो जीवस्य जीवनम्.. प्रमाणे केवळ हातांवर आणि पायांवरच पोट चालणार्या घटकांनी यातूनही थोडा सुस्थित असलेला कांदा वेचून विकला आणि काही दिवस कशीबशी उपजिवीका सुरू ठेवली. मात्र व्हायचे तेच होऊन हा कांदा देखील अंकूरल्यामुळे फेकून द्यावा लागला. बाजारपेठेतून कांदा पूर्णपणे नाहीसा होण्याची चिन्हं दिसू लागली. धनदांडगे व्यापारी आणि काही गुदामांमध्ये असलेला उर्वरित कांदा चढ्या भावाने विक्रीस सुरवात होऊन याचा परिपाक म्हणजे अवघ्या आठ ते बारा रुपये प्रति किलो दराने मिळणारा कांदा आज महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पन्नास ते सत्तर च्या घरात पोहोचला आहे.
शासनाने नुकतीच तातडीची बैठक बोलावून सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन देशातून केली जाणारी कांद्याची निर्यात थांबविण्याचे आदेश नाफेडला दिले आहेत. किंमतीचा उंचावणारा आलेख कुठेतरी थांबण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. शिल्लक चांगला कांदा देशांतर्गत विकण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. शेजारी देश पाकिस्तानमधून काही अंशी कांदा आयात करण्यात येणार असून पंजाबमध्ये हा कांदा सर्वप्रथम पोहोचेल, तेथूनच अन्यत्र वितरीत करण्यात येण्याचे वृत्त आहे.
कुटुंब प्रमुखासारखेच आधी आपल्या कुटुंबाला आणि शिल्लक राहिल्यास दुसर्यांना द्यावे या उक्तीप्रमाणे ही बाब खरोखर प्रशंसनीय आहे. काही का असेना, उशीरा का होईना अखेर शासनाला जाग आली, हे ही नसे थोडके...
onion लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
onion लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, २१ डिसेंबर, २०१०
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०
कांद्याने न चिरताच रडविले...
गेल्या महिन्यात परतीच्या मान्सून नंतर पावसाळा संपला असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तटवर्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात अनेक ठिकाणी अकाली पाऊस झाला. परिणामी सर्वाधिक नुकसान कांदा, मिर्ची चे झाले. बाजारपेठेत जाणार असलेला आणि बाजारपेठेत जाऊन विक्रीच्या बेतात असलेला कांदा पावसात भिजला. मुसळधार पाऊस पडेल अशी सुतराम शक्यता, शंका शेतकरी व व्यापार्यांना नसल्यामुळे कांदा ओला होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा फेकून द्यावा लागला आहे. यातही चांगला कांदा गवसतो का? या आशेने गरीब नागरीक चांगल्या कांद्याच्या शोधात आहेत. तोंडचा घास गेल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणल्याची अर्थातच रडविल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...