मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

हिवाळी अधिवेशन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्मार्टकार्ड माध्यमातून पथकर : प्रायोगिक चाचण्या सुरू- भुजबळ

आधुनिक स्मार्ट कार्डद्वारे पथकर गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वार्तांकनासाठी येणार्‍या पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानास त्यांनी आज दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, की पथकर गोळा करणार्‍या नाक्यांवर कर भरण्यासाठी सध्या वाहनांना थांबावे लागते. त्यांना असे थांबावे लागू नये, यासाठी आधुनिक स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पथकर गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या की टोल नाक्यांवर वाहनधारकांना अजिबात थांबावे न लागता टोल वसूल करता येऊ शकेल. खासगीकरणातून बांधा-वापरा-हस्तांतरीत करा अर्थात बीओटी तत्वावर रस्त्यांची कामे करताना ही संपूर्ण प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. हे रस्ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बांधले जातात. यासंबंधीचे प्रस्ताव वित्त व नियोजन विभाग, मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ पायाभूत उपसमिती इ. टप्प्यांवर मंजूर झाल्यानंतरच कंत्राटदारांकडे कामे ...

हिवाळी अधिवेशन निवासव्यवस्थेबाबत भुजबळ यांनी घेतला आढावा

नागपूर, ता. २१- येत्या १ डिसेंबरपासून नागपूर येते सुरू होत असलेल्या विधीमंडळ-हिवाळी अधिवेशनाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत आढावा घेतला. यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पीठासन अधिकार्‍यांच्या निवासस्थानांखेरीज यंदाही, रवीभवन येथे २४ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्र्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य अधिकारी, कमर्चारी यांच्यासाठी निवासव्यवस्था पूर्ववत राहील. कर्मचार्‍यांसाठी १६० सह ६४ अतिरिक्त निवासी गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींची निवास व्यवस्था देखील 'सुयोग' येथे करण्यात आल्याचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी सांगितले. बैठकीस सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव, विविध विभाग वरिष्ठ अधिकारी, नागपूर येथील स्थानिक अधिकारी उपस्थित होते.