मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मानवाची अंतराळावर स्वारी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

50th Anniversary of the first Human SpaceFlight (12 Apr. 1961)

  युरी गागारिन युरी अलेक्सेइविच गागारिन ९ मार्च, इ.स. १९३४ - २७ मार्च, इ.स. १९६८ हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता. युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला. (सौजन्य- इंटरनेट)