मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी

विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले. अर्हता विनंती नि