मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सावित्रीबाई फुले अर्धपुतळा अनावरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फुले दाम्पत्याचे विचार आजही मार्गदर्शक- के. शंकरनारायणन्

मुंबई, ता. २१- देशातील सामाजिक तसेच आर्थितक विषमता दूर करण्यासाठी सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. असे प्रतिपादन राज्यापाल के. शंकरनारायणन् यांनी केले. वांद्रे (पश्चिम) येथील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या संकुलात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले, की देशाला महासत्ता बनविण्यासाठी, परिवर्तनाची मोठी आवश्यकता आहे. दैनंदिन जीनवात आपण सातत्याने छोटेमोठे बदल स्वीकारतो. मात्र, तेव्हाच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल देखील वेळोवेळी स्वीकारले पाहिजे. यासाठी आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची गरज असून हे केवळ फुले दाम्पत्याच्या विचारांमधूनच शक्य आहे. आजच्या महिला आणि विद्यार्थीनी यांनी फुले दाम्पत्याचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज आपण सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने वावरत आहात. महात्मा फुले पायाभूत सुविधांचे एक कृतीशील विकासक होते. गुलामगिरी, शेतकर्‍याचा असूड आदी पुस्तकांबरोबरच