मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेसबुक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तीळा-तीळाने बोलणे...

होत आहे कमी तीळा-तीळाने बोलणे.. आहेत याला बरीच कारणे.. फेसबुक सुद्धा यातले एक आहे... नको आता श्लोक अन् नको दोहे... नको आम्हां सुश्रुत, चरक वाग्भट... येतात विचार असे मनात पटपट.. पटपट विचाराचाच वाटतो आहे खेद... मित्रांनो, पण विसरू नका कोणी आपला घरचा "आयुर्वेद"...

बदलतेय तंत्र- प्रचारासाठी "सोशल वेबसाइट्स" चा वापर..

पुढल्या आठवड्यात राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. यंदा विशेष म्हणजे सुशिक्षित उमेदवारांची संख्या वाढली असून आपल्या प्रचारासाठी अनेक उमेदवार सोशल वेबसाइटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. गेल्या दशकापासून राजकारणाबाबत समीकरणे बदलत असून दोन वर्षांपासून तर, राजकारणात भ्रष्टाचारमुक्त वातावरणासाठी सुशिक्षित युवा पीढिचा समावेश केला जाण्यावर भर दिला जात आहे. सुशिक्षित व्यक्ती भ्रष्टाचार करायला सहसा धजावत नाही, तिचे विचार, वागणूक, कल इच्छाशक्ती या सगळ्याच गोष्टींमध्ये कमी शिकलेल्या व्यक्तीपेक्षा फरक जाणवतो. परिणामी, खर्‍या अर्थाने विकास आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण तयार करायचे असल्यास युवा पीढितल्या लोकांची आवश्यकता ही काळाची गरज ठरू लागली आहे. येत्या ११ आणि १३ डिसेंबरला राज्यात होणार्‍या राज्यातल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने युवक उमेदवार सरसावल्याचे दिसून येते. सुशिक्षित आणि चाणाक्ष बुद्धीमुळे हे उमेदवार इंटरनेटचा योग्य वापर करून घेणे जाणतात. एरवी प्रचारासाठी कालमर्यादा घालून दिलेली असली, तरी इंटरनेटवरून प्रचार करणे, न करण्यासाठी अद्याप आवश्यक तशी आचारसंहिता अथवा नियम

"गुगल प्लस" चा सामना करण्यास फेसबुक तयार...

अल्पावधीतच गुगलच्या 'ऑर्कुट'ला मागे टाकून संपूर्ण जगातल्या विशेषतः तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या 'फेसबुक'ने गुगलने नुकत्याच सुरू केलेल्या "गुगल प्लस" या सोशल वेबसाइटचा अर्थातच 'गुगल'चा सामना करण्याची तयारी केली आहे. यानुसार काही दिवसातच 'फेसबुक' "एक खास सेवा" देणार असल्याचे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. यासह आणखी काही सुविधा देण्याबाबत काम सुरू असून त्याबाबत मात्र पुढच्या आठवड्यातच माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.