नागपूर, ता. ५- जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. विधान परिषद अधिवेशन प्रसंगी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी पवार यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत एका प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसून नागरीकांचा फायदाच होणार आहे. अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनीही या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्याला डिसेंबर २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करण्याचे शासनाचे नियोजन आहे. राज्याच्या विविध भागात कार्यान्वित होणार्या नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे राज्याला वीज उपलब्ध होईल. याचबरोबर वाढीव वीज मिळण्याची विनंती देखील केंद्राकडे करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. फीडर सेपरेशन, सिंगल फेजिंग आदी सुधारणाही केल्या जात आहेत. दरवर्षी होणारी विजेची मागणी ध्यानात ठेवूनच नियोजन करण्यात आले आहे. आपले मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चांगले ट्यूनिंग असून त्यांच्य...