नागपूर, ता. ५- मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेतून पाच डिसेंबरला निवृत्त होणार्या अकरा सदस्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विधानपरिषदेचे अकरा सदस्य पाच डिसेंबरला निवृत्त होत असल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळ यांच्या मनोगतावर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा रोख भुजबळ यांच्याकडेच असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न श्री. रावते यांनी केला. यावर भुजबळ यांनी त्यांच्या टिप्पणीवर बोलताना म्हणाले, की अभिनय ही एक अभिजात कला आहे. ती कोणालाही सहजसाध्य नाही. नाट्य आणि नाटकीपणा यातही फरक असतो. माझ्या या नाट्यामुळेच मी २५ वर्षे तुमचा नेता होतो. विरोधी पक्षनेता बनलो आणि सत्तारूढ पक्षाला धारेवर धरले ते देखील याच नाट्याच्या जोरावर, याचं भान असू द्या. मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्य ड...