मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

संक्रमण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे. येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय...