मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे.

येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय बदल होतील, आयुषतर्फे आरोग्य-रक्षणासाठी, रक्षकांसाठी काही आचारसंहिता तयार केली जाईल का? यासह अनेक बाबींवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

लॉकडाऊनमुळे कधी नव्हे असा एक चांगला परिणाम मात्र झाला तो म्हणजे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांनंतर एकत्र आली, मुलांच्या, आईबाबांच्या, आजोबाआजीच्या डोळ्यासमोर सगळे कुटुंबीय 24 तास दिसत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. वातावरणात ध्वनी-प्रदूषण, पर्यावरणातील प्रदूषण इ. चे वाढलेले प्रमाण प्रचंड कमी होऊन आता रात्री आकाशात तारे, चांदण्या, सप्तर्शी, शनी, शुक्र, मंगळ, नेपच्यून आदी ग्रह, नक्षत्रे सहज पहाता येत आहेत. याचबरोबर स्कायलॅब, सॅटेलाइट देखील आकाशात फिरताना डोळ्यांनी सहज दिसत असल्याचे काही नागरीकांचे म्हणणे आहे.

परंतु, वर्क फ्रॉम होम..मुळे ऑफिसचा फिल येत नसल्याचे आयटी क्षेत्रातल्या अनेकांचे म्हणणे आहे. 'वर्क फ्रॉम होम' मुळे कंपन्यांची देखील प्रचंड बचत देखील होत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे, अनेकदा प्रोजेक्ट, टास्क सहजासहजी हाताळता येत नसल्याची देखील तक्रार आहे. इंटरनेट सेवेवर अचानक ट्राफिक वाढल्याने नेट कनेक्टिव्हिटी अनेकदा डिस्टर्ब होत आहे, यामुळे मीटिंग्ज, मोठे प्रोजेक्ट्स, फाईल अपलोड आणि डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत.

लॉकडाऊन पूर्णपणे काढून घेण्यात आल्यानंतर मात्र अनेक दिवस काळजी घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे. चेहऱ्यावर मास्क लावणे, शक्यतो लांब बाह्यांचा शर्ट वापरणे, बाहेर निघताना हँडग्लोज, दुचाकी अथवा कार, आपल्या वाहनाची हँडल, संबंधित एरिया निर्जंतुंक केल्याशिवाय शक्यतो निघू नये याप्रकारची खबरदारी  तसेच आणखी उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.

बाहेरगावहून घरी जाण्यासाठी रस्त्यांवर वाहनांची गर्दी नक्की होईल, यासाठी शासन, पोलिस यंत्रणा सावधगिरी बाळगेलच, मात्र नागरीकांनी स्वतः सतर्क रहाणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमांवरच थेट, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करुन, तपासणी अहवाल संबंधित जिल्ह्यांच्या हॉस्पिटलनां (बहुदा ज्या जिल्ह्यातून प्रवासी आले आहेत आणि ज्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत अशा दोन्ही जिल्ह्यांना) शासकीय रुग्णालये, हॉस्पिटलचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल यात शंका नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.