मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

bhujbal लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुजबळ यांच्याकडून ओबामा यांना "स्लेव्हरी" पुस्तक भेट

मुंबई, ता. ६ नोव्हेंबवर - उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी अर्थात गुलामगिरी हे पुस्तक भेट दिले. आपल्यासाठी ही अमूल्य भेट असल्याचे ओबामा यांनी सांगितले. भारतातील सामाजिक चळवळीचे पहिले क्रांतिकारक महात्मा फुले यांनी १३७ वर्षांपूर्वी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरुद्ध लढ्यासाठी योगदान देणार्‍यांना अर्पण केले आहे, हे वाचल्यानंतर ओबामा यांनी , हे पुस्तक आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे सांगितले

विजयी उमेदवारांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे: भुजबळ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्‍यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्‍यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या. यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते

शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा

शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्‍या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.

भुजबळ यांची वेबसाइट...

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेबसाइट तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या चिंतन ग्रुपने ही वेबसाइट तयार केली असून www.chhaganbhujbal.org असा वेबसाइटचा पत्ता आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकर आणि भाषा संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या हस्ते वेबसाइटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. भुजबळ यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने चिंतन ग्रुपने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, की अनेकांनी आपल्याला जीवनकार्य लिहिण्याची विनंती केली. परंतु अद्याप आपल्याला बरेच कार्य करायचे आहे. ही वेबसाइट नियमित अपडेट केली जाणार असून इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचा पर्याय उपलब्ध असलेल्या या वेबसाइटमध्ये भुजबळ यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भुजबळ यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या बातम्या, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील कात्रणांचा येथे समावेश असेल.