लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या.
यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते