मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एम. एफ. हुसेन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एम.एफ. हुसेन यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार हरपला

मुंबई, दि. 9 जून : सुप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसैन यांच्या निधनामुळे भारत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला कायमचा मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या सिद्धहस्त रंगरेखांच्या माध्यमातून या कलंदर कलाकाराने जगप्रसिद्ध कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या काही कलाकृती वादग्रस्त ठरल्या असल्या तरी भारताला विशेषतः महाराष्ट्राला कलेच्या जागतिक कॅनव्हासवर नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या माध्यमातून एम.एफ. हुसैन यांनी जागतिक कलाविश्वात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.