मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

संतपीठ पैठण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा-पवार

मुंबई, ता. १ - पैठण (जि. औरंगाबाद) येथील संतपीठातील अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले आहेत. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात संतपीठाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजेय देवतळे, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार संजय वाकचौरे, प्रकाशमहाराज बोधले आदी उपस्थित होते. संतवाड़्मयाचे शिक्षण देणारे देशातील हे एकमेव संतपीठ असून तीनवर्षांपूर्वी या संतपीठाची स्थापना झाली आहे. सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. संतपीठातील अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्गाच्या भरतीच्या प्रक्रियेबाबत दोन महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरवात करावी. तसेच संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत देखील प्रक्रिया सुरू करण्यात यावी. श्री. टोपे म्हणाले, की संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत संबंधितांना पत्र दिले जाईल. यानंतर अभ्यासक्रमाबरोबर आवश्यक त्य...