corona लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
corona लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णय
सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये
अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत:
रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय
सिडकोने घेतला आहे.
सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब
करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली
उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली
उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment
Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे
तपशील (Installments) व ते भरण्याचा अंतिम दिनांक नमूद केलेले असतात.
सध्याच्या प्रक्रियेनुसार संबंधित वाटपदारांनी वाटपपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे हफ्त्यांची रक्कम एक
रकमी भरावयाची असते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत बॅंकांशी संबंधित समस्या,
अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या, संचार करण्यास असलेले निर्बंध
इ. बाबींमुळे विहीत मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम ऑनलाईन माध्यमातून टप्प्याटप्प्याने अंशतः भरण्याची
मुभा द्यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली होती.
वरिल पार्श्वभूमीस अनुसरून संबंधित भूखंड वाटपदारांनी त्यांच्या भरावयाच्या हफ्त्यांची एकूण रक्कम
टप्प्याटप्पयाने अंशत: ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे
नंतर लागू होणारे विलंब शुल्क हे केवळ उर्वरित रकमेवर लागू होईल व अर्जदारांवर अधिकचा आर्थिक भार
पडणार नाही. तरी सर्व संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशतः ऑनलाइन
पद्धतीने विहीत मुदतीनुसार भरावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
बुधवार, १ एप्रिल, २०२०
'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक
सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे.
अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला, अहो बाबा कचरा नाही काढला तर मग लोकांना कोरोना होईल नां...इतकं ते मिष्किल वयं होतं त्या मुलाचं " मात्र इथे या प्रसंगाचा उल्लेख करण्यामागे उद्देश हाच की पाहा अगदी लहान मुलांना सुद्धा कोरोनाविषयी जाणीव आहे, कोरोना काय आहे रे..हे त्या मुलाला विचारल्यावर तेवढं नाही सांगता आलं, पण आजुबाजुची परिस्थिती, सोशल मीडियावरील पोस्ट, घरात होणाऱ्या चर्चा याकडे त्याचं लक्ष असल्याचा हा परिणाम...
आमच्या लहानपणी एखाद्याला टायफॉईड झाला तर गंभीर समजला जायचा आणि त्या व्यक्तीस शक्यतो हॉस्पिटलमध्येच अॅडमिट करत असत, त्या व्यक्तीच्या जवळही आम्हाला फिरकू देत नसत, तेव्हा इतकं गंभीर मानलं जात होता टायफॉईड. तोच टायफॉईड आता सामान्य झालाय जवळपास...औषधंही सहज उपलब्ध आहेत...नव्यानेच आलेल्या कोरोना अर्थात COVID 19 चे तसे नाही...
शासन सर्वतोपरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहे आणि सध्यातरी १४ एप्रिलपर्यंतच्या आखून दिलेल्या लॉकडाउन कालावधीत सगळ्यांनी घरीच थांबावे, शक्यतो बाहेर पडू नये हाच उपाय आहे. परंतु दररोजच्या बातम्यांवरून, अनेक नागरीक अजूनही ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत हेच लक्षात येतंय. घरी थांबाल तर नंतर शक्यतो अशा प्रकारे घरी थांबायची वेळ येणार नाही हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. दुसरे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे देखील महत्वाचे आहे. आजकाल काही झालं तरीही लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. वयाची पंचे-चाळिशी गाठेपर्यंत तरी लगेच डॉक्टरांकडे जाऊ नये साध्या साध्या गोष्टींसाठी असे वाटते. प्रतिकारशक्ती ही वाढवावी कशी? हा प्रश्न अनेकांना पडला असावा...यासाठी नियमित व्यायाम, योगासने करणे आवश्यक आहे. किमान रात्री जेवताना दोन घास कमी खाऊन पोटात थोडी रिकामी जागा ठेवल्यास अपचनाचा त्रास कमी होईल, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, थोडे सावकाश फिरावे. जेवणात/अन्न तयार करताना आले, लसूण, हिंग यांचा वापर करावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...