सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये
अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत:
रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय
सिडकोने घेतला आहे.
सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब
करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली
उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली
उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment
Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे
तपशील (Installments) व ते भरण्याचा अंतिम दिनांक नमूद केलेले असतात.
सध्याच्या प्रक्रियेनुसार संबंधित वाटपदारांनी वाटपपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे हफ्त्यांची रक्कम एक
रकमी भरावयाची असते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत बॅंकांशी संबंधित समस्या,
अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या, संचार करण्यास असलेले निर्बंध
इ. बाबींमुळे विहीत मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम ऑनलाईन माध्यमातून टप्प्याटप्प्याने अंशतः भरण्याची
मुभा द्यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली होती.
वरिल पार्श्वभूमीस अनुसरून संबंधित भूखंड वाटपदारांनी त्यांच्या भरावयाच्या हफ्त्यांची एकूण रक्कम
टप्प्याटप्पयाने अंशत: ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे
नंतर लागू होणारे विलंब शुल्क हे केवळ उर्वरित रकमेवर लागू होईल व अर्जदारांवर अधिकचा आर्थिक भार
पडणार नाही. तरी सर्व संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशतः ऑनलाइन
पद्धतीने विहीत मुदतीनुसार भरावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.