मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

छात्रभारती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुंबई येथे 15 जानेवारीला छात्रभारतीतर्फे एक दिवसीय कार्यशाळा

मुंबई, ता. 5 - मुंबई येथे रविवारी (ता. 15) छात्रभारतीतर्फे युवकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत तळमजला, पोयाबावडी म्युनिसिपल स्कूल, कामगार मैदानाजवळ, केईएम समोर, परळ, मुंबई येथे हे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मार्गदर्शन करतील. नाटक, सिनेमा, मालिका, वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रसासकीय संधी आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान आदी विषयांवर यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमं खुणावताहेत या विषयावर सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे, तरुण मित्रांनो - कपिल पाटील (शिक्षक आमदार), मनोरंजनाची न्यारी दुनिया - सचिन गोस्वामी (मालिका आणि सिनेमा दिग्दर्शक), चला प्रशासकीय सेवेत - हाजी जतकर (उपायुक्त विक्रीकर), दिल्ली हादरवणारा फकीर - राजा कांदळकर (लेखक, पत्रकार), समारोप: आपण कोण? - ऍड. अरुण दोंदे (अध्यक्ष छात्रभारती) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत प्राध्यापक देखील सहागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी प्रा. जयवंत पाटील, प्रा. ईश्वर आव्हाड (9870329155), प्रा. उत्कर्षा मल्या, प्रा. आर. बी. पाटील,