मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कर्नाळा अभयारण्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्तावित: भुजबळ

मुंबई, ता. ८ (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या चोपदरीकरणाच्या कामामध्ये पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याबाबत गेले वर्षभर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही काही निष्पन्न न झाल्याने या वनविभागातील हद्दीपुरता भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले. सर्वश्री सुभाष देसाई, भरतशेठ गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, रवींद्र वायकर, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत, सूर्यकांत दळवी, विजय शिवतारे, महादेव बाबर या सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेसंदर्भात निवेदन करताना श्री. भुजबळ बोलत होते. महाड-संगमेश्वर येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलची कामे गतीने सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरला परवानगी देत असतानाच त्याठिकाणी आवश्यक पदनिर्मिती तसेच आधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली. यावर, ट्र...