गेल्या महिन्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा थंडी उशीरा पडते की काय? असा विचार डोकावत असतानाच मध्य प्रदेशात दोन दिवसापासून हवामानात बदल झाला आहे. काही भागात सकाळी धुके दिसत असून वाहनांवर दव पडलेले दृश्य सकाळी दिसते. नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणार्या लोकांच्या अंगावर स्वेटर, मफलर, कानटोपी तर महिलांच्या अंगावर शाल दिसत आहे. पारा देखील खाली घसरला असून रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. गुलाबी थंडीत पहाटे फिरायला जाणार्यांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी देखील आता पावसाळा संपला असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.