मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शाहीर आत्माराम पाटील लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा

शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्‍या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.