राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी प्रमुख संशयित म्हणून ठपका ठेवण्यात आलेले खासदार आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आज (सोमवार ता. २५ एप्रिल) सीबीआय ने अटक केली. सीबीआय ने कलमाडी यांना यापूर्वी अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. आजही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली.