काही वर्षांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना हेलमेट लावणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रारंभी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आणि पाठोपाठ काही प्रमुख शहरांमध्ये आणि नुकतेच मध्यप्रदेशातील इंदूर येथे हेलमेट सक्ती करण्यात आली आहे. हेलमेट सक्ती करणे किती परिणामकारक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे. दुचाकी वाहनचालक, कारचालक अर्थात चारचाकी वाहनचालक वाहन भरधाव चालवितात. विशेषतः शहराबाहेर, शहरातील प्रमुख मार्गांवर, राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकदा यात वाहनचालकांचे जीव गमावल्याच्या घटना घडतात. दिवसेंदिवस या प्रकारे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघात झाल्यास किमान जीव गमावण्याची वेळ येऊ नये, "सर सलामत तो..." असे म्हणतात नां! याप्रमाणे न्यायालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी वाहन चालविताना हेलमेट बेल्टसह लावणे अनिवार्य केले आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा, चर्चासत्रांमध्ये प्रतिष्ठितांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सक्तीस दुजोरा दिला. हेलमेट न लावणाऱ्या वाहनचालकास दंड आका...