शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी

मुंबई, ता. 28 - येत्या एक मे स महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असतील.
नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील ११.१० किमी लांबीच्या व ११ स्थानकांचा समावेश असलेल्या "बेलापुर ते पेंढार" मार्गिका क्रमांक एक चे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वेस्थानक (नियोजित) सेक्टर - २४, खारघर, नवी मुंबई येथे रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून यावेळी, जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादन शुल्क व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह खासदार गजानन बाबर, संजीव नाईक,  आमदार व सिडको चे संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील, संदीप नाईक, आदी मान्यवर उपस्थित राहतील. असे सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, मुख्य अभियंता व महाव्यवस्थापक (तांत्रिक) सिडको - बिपीनचंद्र मेहता आणि सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी कळविले आहे.

मध्य प्रदेशही तापले...

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दिवसाचे कमाल ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेले तापमान वाढून काल (ता. २८ एप्रिल) कमाल ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही भागात पारा ४१ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. उन्हामुळे दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी झाली असून अनेक ठिकाणी ऊसाचा रस, कोल्ड्रिंक, शीत पेयांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. काही भागात दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत होत असून रात्रीही डासांचा त्रास होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये डासांचा उपद्रव झाला असून नागरीकांनी प्रशासनाकडे परीसरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.

सुट्टीची भटकंती...(७)

आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता.
नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामुळे मी न रहावून मामीला विचारलं..हे चूर्ण हिंग्वाष्टक चूर्ण होतं. अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं होतं. नंतर पोटही थोडं शेकलं. यामुळे जणू काही जादूची कांडीच फिरली होती. डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज भासली नाही. आपण म्हणतो आयुर्वेदाच्या औषधांमुळे खूप उशीरा बरं वाटतं, पण हा अनुभव मी स्वतः घेतला होता. ऍलोपॅथीचं औषध सुद्धा दोनदा घ्यावच लागतं की...। मग आयुर्वेदाला नावं कशाला ठेवायची? या आजीबाईच्या बटव्यात यासह त्रिफळा चूर्ण, कस्तुरी गोळ्या, त्रिभुवन कीर्ती रस, चंद्रप्रभा वटी, शंखवटी, श्वासकासामृत सिरप, ज्येष्ठमधचूर्ण, सुठ, दालचिनी, थोडी हळद, मिरपूड, जिरपूड, कदली क्षार, जायफळ, वेखंड, पानपिंपळी, वेलदोडा, लवंग, कांदा, दुर्वा अशी कितीतरी सामुग्री होती. यापैकी बर्‍याच गोष्टी तर दररोज स्वयंपाकात वापरल्या जातात.
आज मामाच्या शेतातल्याच आंब्याच्या झाडाच्या कैर्‍यांचं पन्हं आणि गवतात पिकवलेल्या आंब्यांचा रस, पुरी असं पुन्हा एकदा हेवी जेवण होतं. मामीने जेवणात गरम पाणीच प्यायला सांगितलं होतं. मी सुद्धा तसच करून नंतर पुन्हा एकदा मामीने तयार केलेला दुसर्‍या औषधाचा डोस घेतला. गावात यात्रा सुद्धा आली होती. सहज यात्रेत फेरफटका मारायला गेलो. यात्रेत डफडी, भोंगा, बासरी, बॅट सगळ्याच वस्तू होत्या. विविध स्टॉल्स होते. काय काय होतं सांगू? एक विशेष म्हणजे गावात जास्त जाड असे कोणीही नव्हते. स्थूल व्यक्तिमत्व होतं पण आजारी असं कोणीही दिसलं नाही किंवा शहरातल्या माणसांसारखी पोटंही कोणाची हातावर नव्हती. याचं कारण म्हणजे दररोज फिरायला जाणं, शेतावर जाऊन काम करणं हे असावं. शहरात आपण एकाच जागेवर तासन् तास बसलेलो असतो, घरी असताना टीव्ही समोर, आणि ऑफिसमध्ये असताना पीसी समोर...परिणामी अनेक विकार आम्हांला जडले आहेत. ग्रामीण भागात भार नियमनामुळे टीव्ही तर कमीच पहायला मिळतो. शेतात न गेल्यास खाणार काय? असा प्रश्न पडतो...खरंच गावाकडचं वातावरण आणि जीवन किती छान आहे...हे मी अनुभवलं आणि दुसर्‍या दिवशी परत घरी जाण्याचं ठरवलं...

गुरुवार, २८ एप्रिल, २०११

नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी - छगन भुजबळ

मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. व्यक्तिगत पातळीवर माझा एक चांगला मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नारायण आठवले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढयाबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय योगदान दिले. 'लोकमित्र', 'लोकसत्ता' या दैनिकांतील पत्रकारितेबरोबरच 'गोमंतक'चे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत परंतु अत्यंत नि:पक्षपाती व परखड लिखाण केले. सत्तरच्या दशकात आम्ही चालविलेल्या 'प्रभंजन' या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही नारायण आठवले यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. या साप्ताहिकात 'अनिरुध्द पुनर्वसु' या टोपणनावाने त्यांनी केलेले ललित लेखन त्या काळात खूप गाजले. 'चित्रलेखा'मधील त्यांचे लेखही चांगलेच गाजले. सन 1996मध्ये शिवसेनेतर्फे लोकसभेवर खासदार म्हणून त्यांना केवळ अठरा महिने काम करण्याची संधी लाभली तरी, तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्यासमोर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाविषयी आवाज उठविण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली होती. या विविध क्षेत्रांतले त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असेही भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांनीही नारायण आठवले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एक अत्यंत हुशार व जाणकार पत्रकार, लेखक म्हणून लौकिक असलेल्या आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आजच्या पत्रकारांनी आदर्श घ्यावा, अशी पत्रकारिता नारायण आठवले यांनी केली. पत्रकारितेची मूल्ये जोपासत असताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही, अशा भावना आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

सुट्टीची भटकंती...(६)

...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्‍या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी थोडी मोठी असल्यामुळे अरूंद गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नव्हती. तिथे गल्लीच्या तोंडावर गाडी थांबून कर्मचारी थेट आतमध्ये येऊन कचरा नेताना दिसत होते. सगळा कचरा गोळा करून गावापासून सरासरी पाच ते सहा किलोमीटर दूर नेऊन तिथे स्वतंत्र व्यवस्था केली होती. कचर्‍यातलं प्लॅस्टिक इथे वेगळं केलं जायचं. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज वापरण्याची बंदी इथेही घातलेली होती. म्हणून शासनमान्य प्रमाणातील कॅरी बॅग्ज किंवा कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह केला जात होता (कॅरी बॅग ला..मी गंमतीने वाहक पिशवी असं म्हटलं आणि आमच्या मामाला हसू आलं).
गावातल्या काही धनाढ्यांकडे खूप गाई होत्या. त्यांनी गावाबाहेर छानसं फार्म हाऊस तयार केलं होतं. इथून दूध शहरांमध्ये पाठवलं जायचं. तसंच गावच्या सरपंचाने तर दुधापासून तयार होणार्‍या पदार्थांचा छोटासा कारखानाच सुरू केला होता. त्यालाही प्रतिसाद चांगला होता. हा कारखाना बघण्याची मनात इच्छा होती. सरपंच चक्क बी. एस्सी. पीएच. डी. असल्यामुळे संशोधनातही त्याला अभिरूची होती. त्या दृष्टीने तो सुद्धा याव्यतिरिक्त काहीतरी प्रयत्न करतोय असं वाटलं.
घरी परत येताना बस स्थानकाशेजारच्या हॉटेलमधून मस्तपैकी वड्यांचा आणि मिसळीच्या रस्श्याचा वास आला. आज वडा-पाव आणि मिसळ खायची असा विचार केला आणि हॉटेलमध्ये शिरलो. पाहिलं तर थोडंस अस्वच्छ असं हॉटेल होतं. इतक्या सकाळी सुद्धा गावातल्या नागरिकांप्रमाणे माशाही उठलेल्या जाणवलं. पण विचार केला, इथले लोक तर इथे खातातच आपण ही खाऊन पाहू...वडा-पाव खायला सुरवात केली, मात्र...पाव वडा खायला सुरवात केली आणि काय विचारता। तिखट पण खावा असाच वाटणारा तो वडा होता. नाकातून पाणी यायला आणि कान खाजवायला सुरवात झाली. ऑर्डर प्रमाणे त्यांनी संगळं दिलं होतं आता खाणं आवश्यकच...। कमी गर्दी असल्यामुळे हॉटेलच्या मालकाला ते लक्षात आलं. जवळ येऊन त्याने, नवीन दिसताय? कुठून आलात? जास्त तिखट लागलं का? अरेरे...अरे, थोडा कलाकंद आण पाहू...असं एका वेटरला(कळकट कपड्यातल्या पोर्‍याला) सांगितलं. कलाकंद खाल्ल्यानंतर जरा बरं वाटलं. माझ्या समोर बसलेला एक माणूस तर चक्क मिरची कचाकचा खात होता..ते पाहून तर मलाच चर्र झालं. मिसळही खाल्ली, वरून मुद्दामच हॉटेलचा चहा प्यायलो. बिल द्यायला गेलो, मात्र खिशात पैसे थोडे कमी होते. असं कुठे जाऊ याची शक्यता नसल्याने मोजके पैसेच खिशात ठेवले होते. आता काय करावं? या विचारात असताना हॉटेलच्या मालकाने ते ओळखलं आणि तुम्हा पाहूणे आहात, राहू द्या पैसे. असं सांगितलं आणि घेतलेले पैसेही परत केले. मी खूप आग्रह केला तरी घेतले नाहीत...गावच्या माणसांच्या मायेचा ओलावा आणि शहरातील शुष्कता रूक्षपणा यावरून माझ्या लक्षात आला..!

बुधवार, २७ एप्रिल, २०११

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर

झिंबाब्वे चे माजी कसोटीपटू डंकन फ्लेचर यांची भारतीय संघाचा कोच (प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. श्री. फ्लेचर यांनी यापूर्वी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सुमारे आठ वर्षे भूषविले आहे. अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

सुट्टीची भटकंती...(५)

आज सकाळी मला जाग आली, ती कोणाच्या तरी भांडणामुळे...। ओसरीवर जाऊन पाहिलं तर, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण सुरू होतं. पाण्यासाठी नंबर लावण्यावरून हे भांडण असल्याचं लक्षात आलं...इथे विषय भांडणाचा असला, तरी ग्रामीण भागात अजूनही विशिष्ट वेळेत ग्रामपंचायत पाणी पुरवठा करते. आजकाल शहरांमध्येही असंच चित्र पहायला मिळतं. ग्रामीण भागात मात्र अन्य वेळात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावरून किंवा पाणवठ्याच्या जागेवरून पाणी आणावं लागतं. आजकाल तसं सगळ्याच ठिकाणी 'ससे' अर्थात समाजसेवक झाले आहेत, ते टँकरद्वारे पिण्याचे पाणी अथवा वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात, हे वेगळं. तसंच जमीनीत बोअरिंग करून सुद्धा गेल्या दशकापासून खासगी रितीने स्वतःसाठी पाणी उपलब्ध करून घेतलं जातं.
मामाच्या गावात फिरताना काही ठिकाणी गोबर गॅस ही संकल्पना दिसली. गावामध्ये जवळपास प्रत्येकाकडे गाई, म्हशी असतातच. यांच्या शेणापासून गवर्‍या थापून झाल्यानंतर उर्वरित शेण या गॅससाठी वापरलं जातं, तसंच बर्‍याचदा प्लॅस्टिक विरहित कचरा सुद्धा लोक यात टाकताना दिसतात. पण यामुळे पैशाची बचत होते असं म्हणतात. याला जागा मात्र जास्त लागते. नाहीतरी, शहरात जवळपास बाराही महिने घरगुती गॅसची टंचाई भासते (भासवली जाते). घरगुती गॅसच्या किंमतीही दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालताहेत.
आज शेजारीच लग्नं होतं त्यामुळे मामाकडे घरी स्वयंपाक होणार नव्हता. लग्न लागल्यानंतर अगदी टाळी वाजल्यानंतर म्हटलं तरी चालेल, लगेच पानं वाढण्याची तयारी सुरू झाली. वाढण्यासाठी म्हणून चक्क केळीच्या पानांचा उपयोग केला जातो. छान, वरण, पोळी आणि वांग्याची भाजी..। पोळी कुस्करून झाल्यानंतर आळं करून त्यात गरम-गरम वरण वाढतात आणि तूप ओतून मनसोक्त खातात, सोबत वांग्याची घोटलेली भाजी..असं हे जेवण म्हणजे पक्वान्नच असतं. जेवून घरी आल्यानंतर केव्हा झोप लागली कळलंही नाही...

मंगळवार, २६ एप्रिल, २०११

मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम मंजूरी: कामाला लवकरच सुरवात

हाजी मलंगगड (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथे येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक फ्युनिक्युलर यंत्रणा बसविण्याच्या प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल (ता. २५) अंतिम मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात करता येणार आहे.
राज्यातील उंचावरील देवस्थानांच्या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची संकल्पना मांडणार्‍या सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे.
हाजी मलंगगडासह सप्तशृंगी गड, माहुर गड आणि जेजुरी या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची कल्पना श्री. भुजबळ यांनी मांडली होती. सप्तशृंगी गडावरही फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून उर्वरित दोन गडांवरील कामेही लवकरच मंजूर केली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हाजी मलंगगड येथे प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी १० मार्च २००८ ला मिळाली असली तरीही हा प्रकल्प माथेरान इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असून याला माथेरान मॉनिटरिंग कमिटी तसेच केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळणे देखील आवश्यक होते.
प्रत्येकी ६० प्रवासी क्षमता असलेल्या दोन ट्रॉलींची ही यंत्रणा उभारण्यासाठी विक्रोळी येथील सुप्रिम सुयोग यशिता कन्सोर्टियम या कंपनीला २४ वर्षे ५ महिने (बांधकाम कालावधीसह) मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात ११७४ मीटर लांबीच्या मार्गावर फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याबरोबरच ८०० मीटर जोडरस्ता चौपदरी काम करणे, प्रत्येकी ६० प्रवासी क्षमतेच्या दोन ट्रॉली, पायथ्याशी व डोंगरावरील ट्रॉली स्टेशन्स. पार्किंगची सोय, भाविकांसाठी स्वागत कक्ष, स्वच्छतागृह इ. सुविधा, रॉक फॉल प्रोटेक्शन सिस्टीम (दरडरोधक सुरक्षा यंत्रणा) तसेच वृक्षारोपण व परीसर सुशोभीकरण यांचाही समावेश आहे.

अगोदर भारतीयांचाच विचार करावा...

शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला भारत पेट्रोल आणि डिझेल निर्यात करण्यास तयार आहे. देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचे दर वाढत आहेत.सरकारने पाकिस्तानला पेट्रोल आणि डिझेल निर्यात कऱण्याऐवजी देशातील नागरिकांना सुरळीत आणि स्वस्त पुरवठा कसा होऊ शकेल? याचा विचार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे.

सुट्टीची भटकंती...(४)

घरी परतल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहू म्हटलं...। पण तेवढ्यात वीज गेली...झालं...। ग्रामीण भागात सध्या जवळपास दहा तास दररोज वीज (भार-नियमन) जाते. ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना कुठे जातात कुणास ठाऊक? बहुदा फक्त कागदोपत्रीच असाव्यात असं मला वाटतंय. शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे...हे शासनाचं धोरण कुठे गेलं? आणि इतकी वीज घालवून ग्रामीण भागावर कितीतरी अन्याय केला जातोय. बिच्चारे शेतकरी बांधव...खरंच त्यांची कीव करावी असंच वाटतं. वास्तविक गरीब असो, की श्रीमंत...सगळ्यांना भूक तर लागतेच. सगळ्यांना दररोज जेवण लागतंच. केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशच कृषि अर्थातच शेतीसाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहे. परिणामी शासनाने ही बाब गांभीर्याने इतके दिवस विचारात का घेतली नाही? वीजेचा तुटवडा काही एकदम होत नाही. आपल्याला एखादा मोठा आजार व्हायचा असेल तर शरीर जसे आधी सूचना देतं, त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र नक्की मोठा असा आजार, विकार जडतो. अगदी तस्सच इथेही आहे, पण तसं झालं तर शासन आणि राजकारण काय ते? अशा नाना प्रश्नांचं काहुर माजलं. शेवटी विचार केला, मिस्टर कूल..होण्यातच सगळंकाही आहे. उगाच रागावून, संतापून काय उपयोग? म्हणतात नां, भले भले भागले..देव पूजेला लागले...।
मामाकडे इनव्हर्टर होतं, पण सतत वीज जात असल्यामुळे ते सुद्धा पुरेसं चार्ज होत नव्हतं. बिच्चारा..करणार काय? मामीने कंदील आणि मेणबत्त्या लावल्या...नेमका गॅसही संपला. त्यामुळे स्टोव्ह वरच स्वयंपाक सुरू झाला. थोड्या वेळाने रटरट शिजणारा भात...मस्तपैकी आंबटगोडाचं वरण, बिबड्यांचा वास आला आणि सपाटून भूक लागली. सोबत काकडी, टोमॅटो होतेच. जेवणं झाली। ओसरीवर मामा-मामी बरोबर गप्पा मारत बसलो. पण तिथेही व्यत्यय आलाच. काही क्षणातच डासोपंत चावरे यांचं पथक तिथे आलं आणि त्यांनी कानात गुणगुण सुरू केली. त्या दोघांपेक्षा मलाच डास जास्त चावत होते. एकतर, माझा रक्तगट A+ असल्यामुळे (अशा रक्तगटाच्या माणसांना डास जास्त चावतात असं म्हणतात किंवा नवीन ते सुद्धा शहरी माल वाटल्यामुळे) डासांनी मनसोक्त चावून पोट भरलं असावं. कुठून काय माहिती, वार्‍याची मंद झुळुक मधुनमधुन येत होती, त्यामुळे तरी डास उडत होते. रात्रीचे दहा केव्हा वाजले कळलंही नाही. साडेदहा वाजताच मी झोपलो...
(पुढे सुरू..पण उद्याच्या भागात...)

सोमवार, २५ एप्रिल, २०११

सुरेश कलमाडी यांना अटक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी प्रमुख संशयित म्हणून ठपका ठेवण्यात आलेले खासदार आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आज (सोमवार ता. २५ एप्रिल) सीबीआय ने अटक केली.
सीबीआय ने कलमाडी यांना यापूर्वी अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. आजही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली.

सुट्टीची भटकंती...(३)

पहाटे पाच वाजताच मामाने उठवलं. मी फ्रेश होईपर्यंत मामीने चहा टाकला होता. त्या चहाला काय चव होती सांगू? व्वा. कधी नव्हे ते शुद्ध आणि धारोष्ण दूध होते त्या चहात. त्यामुळे तो चहा इतका छान लागत होता, की अगदी ३-४ कप प्यावासा वाटत होता...। शेत गावापासून थोडं दूर असल्यामुळे बाईकने जाऊ या, असं मामाने सांगितल्यानंतर मी बाईकऐवजी बैलगाडीने जाऊ असं म्हटल्यानंतर मामालाही आनंद झाला. जोडी गाडीला जुंपून पांथस्थ झालो. सकाळच्या त्या आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या त्या रस्त्यावर बैलांच्या गळ्यातली घंटा मंजूळ स्वरांनी भारल्याप्रमाणे वाजत होती, ते छान वाटत होतं. वाटेत भेटणारा जवळपास प्रत्येकजणच मामाला रामराम...। करत होता. शेत जवळ येऊ लागलं तशी कच्ची वाट लागली...आणि पाहता-पाहता आमच्यापुढे नकळत सात-आठ बैलगाड्या दिसल्या आणि मी आवाक झालो. गावाकडचे लोक किती लवकर उठतात आणि शेतावर जातात हे लक्षात येऊन काही अंशी माझी स्वतःची आणि शहराची तुलना करू लागलो...असो। ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी सातला शेतात पोहोचलो.
शेतात पोहोचल्यानंतर बैलांची जोडी मामाने एका मोठ्या झाडाखाली बांधली. आम्ही पुढे गेलो, परंतू शेतात तर कोणतच पीक दिसत नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नसेल असा अंदाज मी मनात बांधला. मामाला शेतात काहीच नाही, मग कशाला आलोय आपण? असा प्रश्न केला. त्यावर तो मिश्किलपणे हसला आणि, काहीही नसलं तरी तण-काडी असतेच नां...। असं सांगून समोर शेतात पडलेला कचरा वेचणी सुरू केली. मी सुद्धा जमेल तशी मदत करू लागलो आणि काही तासांमध्ये भरपूर तण-काडी गोळा झाली. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. झाडावरच्या कावळ्यांना पोटातले कावळे सुद्धा ओरडून दाद आणि साद देत होते. त्यामुळे आम्ही विहीरीवर जाऊन आधी हातपाय स्वच्छ धुतले. नंतर जेवणासाठी झाडाखाली गेलो. एव्हाना बैलांनी सुद्धा कडबा आणि घासगंजी खाऊन फस्त केली होती. अजून नांगरटीची कामं नसल्यामुळे त्यांना तसा आरामच होता. बैल सुद्धा बसून संथपणे रवंथ करत होते. आम्ही मामीने दिलेला टिफिन उघडला..टिफिन उघडल्यानंतर टिफिनमधून मस्त ठेच्याचा वास आला..मस्तपैकी मिरचीचा ठेचा आणि कळण्याच्या भाकरी, पुरी, काकडी, टोमॅटो यांचं सलाद, सोबत लिंबू दिलं होतं. जेवणावर ताव मारून आम्ही पुन्हा कामाला सुरवात केली. पण कधी नव्हे ते इतके सुग्रास अन्न मिळाल्यासारखेच मी जेवल्यामुळे झोप आली होती. काही वेळ झोपू असा विचार करून मी मामाला सांगितलं आणि पुन्हा झाडाखाली येऊन तिथल्या ताडपत्रीवर जाऊन पहूडलो आणि क्षणात झोप लागली.
संध्याकाळी पाचला जाग आल्यानंतर पुन्हा थोडं काम केलं. सूर्य मावळतीला आल्यानंतर आम्ही परत घराकडे कूच केलं. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा चहा प्यायलो...

चिंतन ग्रुप पुणे तर्फे राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार उत्साहात

पुणे - येथील चिंतन ग्रुपतर्फे आयोजित, राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार नाशिक विभागातर्फे स्वीकारताना स्नेहलता कोल्हे.

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

"महाराष्ट्राचं पर्यटन" जागतिक नकाशावर...!


महाराष्ट्र शासनानं सन 2011-12 हे वर्ष 'पर्यटन वर्ष' म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. राज्यातल्या पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थानं चालना मिळण्यासाठी आणि पर्यटन वर्ष यशस्वी होण्यासाठी राज्याचा पर्यटनमंत्री म्हणून मला पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांचं उत्स्फूर्त सहकार्य अपेक्षित आहे. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या, उद्योजक, टूर ऑपरेटर्स, 'बेड ऍन्ड ब्रेकफास्ट' योजनेचे चालक, बस व टॅक्सीचालक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व पर्यटक मंडळींचं सहकार्यही मोलाचं ठरणार आहे. सांगत आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ...
(शब्दांकन व सौजन्यः आलोक जत्राटकर)

'लोकराज्य' मासिकातर्फे यंदा एप्रिलचा अंक हा 'पर्यटन विशेषांक' म्हणून प्रकाशित करण्यात येत असल्याचं समजून अत्यंत आनंद वाटला. या विशेषांकाला मी मनापासून शुभेच्छा देतो.
पर्यटन हा आजघडीला आपल्या देशातला एक महत्त्वपूर्ण उद्योग आहे. या क्षेत्रातली रोजगारनिर्मितीही मोठी आहे. पर्यटन क्षेत्रात दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून किमान 40 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होत असते. राष्ट्रीय सकल उत्पन्नामधला (जीडीपी) या क्षेत्राचा वाटा 6.23 टक्के इतका आहे. भारताला दरवर्षी सुमारे 50 लाख परदेशी पर्यटक भेट देतात, तर स्थानिक पर्यटकांची संख्या सुमारे 562 दशलक्ष इतकी आहे. दोन वर्षांपूर्वी या क्षेत्रानं आपल्या देशाला सुमारे शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करून दिली आणि सन 2018 पर्यंत हा आकडा 275.5 अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात प्रचंड पर्यटन क्षमता
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटनाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर, या राज्यात पर्यटन विकासाची प्रचंड क्षमता असल्याचं आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्राची अन्य राज्यांशी किंवा अन्य देशांशी तुलना करून सांगायचं झाल्यास, बर्फाच्छादित शिखरं आणि वाळवंट या दोन गोष्टी सोडून बाकी सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, असं म्हणता येईल. कोकणच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक अप्रतिम, निसर्गसंपन्न समुद्रकिनारे, हिरवीगार, दाट आणि प्राणीपक्ष्यांनी समृध्द जंगलं-अभयारण्यं, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेले आणि आजही आपल्या इतिहासाची साक्ष अभिमानानं मिरवणारे 350हून अधिक गडकिल्ले, जलदुर्ग, पंढरपूर, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठादी धार्मिक स्थळं, महाबळेश्वर, माथेरान, इगतपुरी, चिखलदरा, तोरणमाळ, जव्हार अशी गिरीस्थानं (हिल-स्टेशन्स), अजिंठा-वेरुळसारखी जगात कुठंही पाहायला मिळणार नाहीत अशी अप्रतिम लेणी, राज्याच्या कला आणि संस्कृतीची साक्ष पटविणारी आणि अजूनही जोपासणारी कित्येक नगरं, मुंबई-पुण्यासारखी कॉस्मोपॉलिटन शहरं... अशा किती गोष्टी सांगाव्यात, त्या सर्व या महाराष्ट्रात आहेत. या ठिकाणी काही सुविधांची वानवा जरी असली, तरी एकदा पर्यटकांचा ओघ सुरू झाला की खाजगी गुंतवणूकदारांचा ओघही तिकडे आपोआपच वाढू लागेल. त्याचबरोबर स्थानिकांनाही आपोआपच छोटया-मोठया उद्योगांच्या कल्पना मिळू शकतील. रोजगार तर निश्चितच उपलब्ध होतील.
रोजगाराच्या बाबतीत मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे केवळ महानगरांतच नव्हे; तर, राज्याच्या गावागावांत रोजगार निर्माण करण्याची क्षमता जर कोणत्या क्षेत्रात असेल तर ती केवळ पर्यटनातच आहे. याच दृष्टीनं आपण या क्षेत्राकडं पाहिलं तरच त्याचा विकास होऊ शकणार आहे.
भारतात दरवर्षी साधारणपणे 50 लाख परदेशी पर्यटक येतात. त्यापैकी सुमारे 20 लाख पर्यटक सर्वप्रथम मुंबईत उतरतात आणि मग देशाच्या अन्य भागांत जातात. अजिंठा-वेरूळव्यतिरिक्त राज्याच्या अन्य पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या खूप कमी आहे. त्याचप्रमाणं देशविदेशांतून राज्यात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही खूप मोठी आहे. या दोन्ही प्रकारच्या पर्यटकांना आपण राज्याच्या अन्य पर्यटनस्थळांकडं आकर्षित करण्यात यशस्वी झालो तरी आपल्या पर्यटन क्षेत्राची प्रचंड भरभराट होईल, यात शंका नाही.

वॉटर-स्पोट्र्स व ट्रेकर्स पॅराडाइज
आपल्या कोकण किनाऱ्याबरोबरच मुंबई तसंच मोठया नद्यांवर जलक्रीडा (वॉटर-स्पोट्र्स) विकासालाही मोठी संधी आहे. याला पर्यटकांचाही मोठा प्रतिसाद लाभतो. त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगांत किंवा अभयारण्यांशेजारी बंजी जंपिंग, हॉट एअर बलून, पॅरा ग्लायडिंग, रॉक क्लाइंबिंग असे उपक्रमही राबविता येणं शक्य आहे. बाहेरच्या देशांत गेल्यानंतर आपल्याकडच्या हौशी व साहसी पर्यटकांना त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या सोयी त्यांना आपण आपल्या राज्यातच उपलब्ध करून देऊ शकतो. अशा कित्येक हौशी, साहसी पर्यटकांना त्याचा लाभ होऊ शकेल. त्यासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन खाजगी ऑपरेटर्सनी पुढं येण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं आपण 'सह्याद्री ट्रेकर्स पॅराडाइज' नावाची योजनाही तयार केली आहे. आपल्या राज्यात आठ महिने ट्रेकिंग सहज शक्य आहे. त्यासाठीची साधनं, वैद्यकीय सुविधा, ग्रामीण-आदिवासी आदी स्थानिकांचा सहभाग मिळवून या योजनेला आकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

'जो कोकण अनुभवतो, तो प्रेमातच पडतो!'
आपला कोकण तर एकदम भन्नाट असाच प्रकार आहे. काय नाही सांगा आपल्या कोकणात? इथल्या मातीपासून इथल्या माणसांपर्यंत सर्वांतच एक प्रकारचा गोडवा भरलेला आहे. इथल्या नारळी-पोफळीच्या बागा, वाडया, कोकणी घरं, कोकणी आदरातिथ्य, ताजे चवदार मासे; या मातीत उगवणारी आंबा, काजू, फणस आदी फळं या सर्वच गोष्टी अगदी वैशिष्टयपूर्ण. त्यांचं पेटंट अगदी कोकणाचंच असावं, इतकं इतर ठिकाणांच्या तुलनेत त्यांचं वेगळेपण जाणवतं. उन्हाळा वगळता अन्य आठ महिने इथं ओसंडून वाहणारं निसर्गसौंदर्य पाहता या 'परशुरामाच्या भूमी'मध्ये खऱ्या अर्थानं भारताचा कॅलिफोर्निया होण्याची क्षमता आहे. किंबहुना, या कोकणच्या बळावर आपण स्वित्झर्लंडकडे जाणारा पर्यटकही आपल्या महाराष्ट्राकडं वळवू शकतो, असा मला ठाम विश्वास आहे.
त्यामुळं सागरी किनारा व सृष्टी पर्यटनावर (कोस्टल टुरिझम) अधिक लक्ष आम्ही केंद्रित केलं आहे. कोकणच्या या किनाऱ्यावर बोर्डीपासून ते अगदी वेंगर्ुल्यापर्यंत अतिशय सुंदर बीचेस आहेत. तुम्हाला सांगतो, मी जगाच्या पाठीवरचे अनेक समुद्रकिनारे पाहिले आहेत, पण आपल्या सिंधुदुर्गाइतके मनोहर किनारे मला कुठंही आढळले नाहीत. 1999 साली केंद्र सरकारनं पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला 'सिंधुदुर्ग' हा देशातला पहिला जिल्हा होता. प्रत्येकानं एकदा तरी अनुभवावा आणि मग सांगावा, असा हा परिसर आहे. 'कोकणाचं वैभव जो अनुभवतो, तो त्याच्या प्रेमात पडतोच,' असं माझं मत आहे.

गोव्याचा पर्यटक वळतोय कोकणाकडे!
आता एक गोष्ट दिसतेय की, गोव्यातल्या गजबजाटामुळे तिथं येणारे बहुतांशी पर्यटक हल्ली वेंगुर्ला, मालवण, सिंधुदुर्ग इथं येऊ लागले आहेत. त्यांना 'अनस्पॉईल्ड बीचेस' हवे आहेत. अशा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासन पावलं उचलत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आवडतील असे खास 25 समुद्रकिनारे निवडून तिथं पायाभूत सुविधा तसेच पर्यटक निवासांची क्षमता वाढविणं, किनारा स्वच्छता, प्रसाधनगृह, चेंजिंग रुम्स या गोष्टींची उभारणी सुरू आहे. त्याचबरोबर, पर्यटकांच्या माहितीसाठी संपूर्ण कोकणात माहितीफलक आणि दिशादर्शक चिन्हे (साइनेज) आपण लावतो आहोत. पर्यटक सुविधा व मार्गदर्शन केंद्रे उभारतो आहोत. त्यामुळं परदेशी पर्यटक कोकणाकडे आकृष्ट होऊन मोठया प्रमाणावर पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, अशी मला आशा आहे.

प्रवाळ दर्शनासाठी लवकरच 'ग्लास बॉटम बोट्स'
सिंधुदुर्ग इथं सुरू करण्यात आलेल्या स्नॉर्केलिंग आणि स्कुबा डायव्हींग या सुविधांकडं त्याचप्रमाणं तारकर्लीच्या हाऊसबोटकडंही पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सिंधुदुर्गानजीकच्या पाण्यात विविधरंगी मासे, समुद्रवनस्पती, प्रवाळ (कोरल्स) अशी प्रचंड जैवविविधता आढळते. त्यांच्या निरीक्षणासाठी येत्या वर्षभरातच याठिकाणी 'ग्लास बॉटम बोट्स'ची उपलब्धता आम्ही करणार आहोत.

डॉल्फिन सफारी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांत निव्वळ डॉल्फिन सफारीसाठी आपल्याला किमान शंभर ते दीडशे डॉलर मोजावे लागतात. आपल्या किनाऱ्यावर आपल्या डोळयांसमोर डॉल्फिनचं नृत्य दिसत असतं, पण आपण मार्केटिंगमध्येच कमी पडतो. ही त्रुटी आता आपण दूर करणार आहोत.
त्यादृष्टीनं सिंधुदुर्ग विमानतळ सन 2013 पर्यंत कार्यान्वित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. आरवली, मिठबांव आणि शिरोडा इथं पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी शासनानं जमिनी दिल्या आहेत. पण कोस्टल रेग्युलेशन झोनच्या (सीआरझेड) नियमांमुळं अजून तिथं काही काम करता येऊ शकलेलं नाही. नव्या सीआरझेड नियमांमध्ये पर्यटनासाठी थोडीशी सूट मिळेल, असं दिसतं. तसं झालं तर, बऱ्याच गोष्टी सोप्या होतील आणि कोकण पर्यटनाला मोठया प्रमाणात चालना मिळेल.

उत्तर महाराष्ट्रातही मोठं पोटेन्शियल
कोकणासारखीच पर्यटनविकासाची क्षमता उत्तर महाराष्ट्रातही आहे, ही गोष्ट मला मुद्दामहून सांगावीशी वाटते. मुंबईपासून केवळ 200 किलोमीटरवर असलेल्या नाशिकबरोबरच उत्तर महाराष्ट्रात पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत, पण अद्याप त्यांची माहिती कोणाला नाही. थंड हवेचं ठिकाण म्हटलं की आपसूकच आपल्या तोंडी महाबळेश्वरचं नाव येतं. पण आपल्या इगतपुरीतही तितकंच पोटॅन्शियल आहे, हे साऱ्यांना माहित होण्याची गरज आहे. अशी अनेक पर्यटनस्थळं, तीर्थक्षेत्रं उत्तर महाराष्ट्रात आहेत. नावंच घ्यायची झाली तर कुंभमेळयासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक शहराखेरीज जिल्ह्यात सप्तशृंगी, कावणाई, अंकाई किल्ला, निवृत्तीनाथ समाधी आहे, नगरचा भुईकोट किल्ला आहे, नेवासा इथलं ज्ञानेश्वर स्मारक आहे, जळगावमधलं पाटणादेवी, मुक्ताईनगर आहे, धुळयाचं गोंदूर, शिंदखेडा आहे, तसंच नंदुरबारमधलं प्रकाशा आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण पर्यटन विकासाचा विचार करत असताना उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन संधी नजरेआड करून चालणार नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे.

वन-पर्यटनासाठी...
वन-पर्यटन (इको-टुरिझम) वृध्दिंगत करण्यासाठी सुध्दा महाराष्ट्रात प्रचंड अशी संधी आहे. 5 राष्ट्रीय उद्याने, 27 अभयारण्यांसह 25 वनउद्याने आपल्याकडं आहेत. सध्या विदर्भात आपण वनपर्यटनाच्या विकासासाठी काम करतो आहोत. निसर्ग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून आपल्याला 38 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात भर घालून राज्य शासन वनविभागाच्या हद्दीबाहेर सुमारे 50 कोटी रुपयांची कामे करीत आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाबरोबर सामंजस्य करार करून वनक्षेत्रात कॅम्पिंग, जंगल ट्रेल व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्यटन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातूनही या वनक्षेत्राच्या हद्दीबाहेर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ताडोबा, पेंच, बोर, चिखलदरा याठिकाणी सध्याही आमचे पर्यटक निवास आहेतच.

'कास' चं पुष्पवैभव
कास पठाराच्या आमच्या प्रसिध्दी मोहिमेला मोठं यश लाभलं असून निसर्गप्रेमींचा उदंड प्रतिसाद याठिकाणी लाभतो आहे. मात्र, इथं येणाऱ्या स्थानिक पर्यटकांकडून परिसरात मोठया प्रमाणात अस्वच्छता माजवली जाते. असंच होत राहिलं तर आपलं हे पुष्पवैभव एक दिवस नष्ट होऊन जाईल, अशी भिती वाटते.

'गरज जबाबदार पर्यटनाची!'
याठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे केवळ कासच नव्हे; तर, अन्य ठिकाणी सुध्दा आपण लोक जबाबदार पर्यटक म्हणून वावरत नाही. बाहेरच्या देशांत जाऊन आलो की, आपण तिथल्या स्वच्छतेचे मोठे गोडवे गातो. तिथले स्थानिक लोक अस्वच्छता करत नाहीत, म्हणून ती स्वच्छता जोपासली जाते, या गोष्टीकडं मात्र आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. 'बाहेरचं ते चांगलं, आपलं ते वाईट' हा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे. केवळ यंत्रणांना दोष देऊन चालणार नाही; तर, एक जबाबदार पर्यटक, एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपलं योगदानही देण्याची गरज आहे.

'लोणार' कडं विशेष लक्ष
लोणार सरोवर परिसराच्या विकासासाठीही आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत. नुकतीच यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक घेतली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संशोधकांनीही तिथल्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांच्या संवर्धनाचं काम अतिशय उत्तम रितीनं केल्याचं दिसतं आहे. त्यामुळं राज्यात अन्यत्रही त्यांच्याकडून अशाच पध्दतीच्या कामाची अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.

अजिंठा-वेरुळचा विकास जागतिक सहकार्यातून
जागतिक वारसा म्हणून 'युनेस्को'ने घोषित केलेल्या, औरंगाबाद परिसरातील अजिंठा-वेरूळच्या लेणी हा आपल्या पर्यटनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटक या लेण्यांना भेट देत असतात. त्यादृष्टीनं त्यांच्या संवर्धनाचं त्याचप्रमाणं विविध पर्यटक सुविधा उपलब्ध करण्याचं कामही आम्ही हाती घेतलं आहे. या लेण्यांचं जागतिक महत्त्व लक्षात घेऊन जपान सरकारनं या लेण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी आर्थिक सहकार्याचा हात पुढे केला आहे. त्या माध्यमातून परिसरात विविध पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. त्यामध्ये उद्यान, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रस्ते सुविधा, विशेष बसेस अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
या लेण्यांबरोबरच राज्यात घारापुरी (एलिफंटा), पितळखोरा, नाशिक-पन्हाळयाची पांडव लेणी, लेण्याद्री, मुंबईतल्या कान्हेरी गुंफा अशा कित्येक ठिकाणी प्राचीन लेण्यांचं वैभव विखुरलं आहे. त्यांच्या संवर्धनासाठीही राज्य शासनाकडून पावलं उचलण्यात आली आहेत, येत आहेत.

औरंगाबादचं 'कलाग्राम' लवकरच खुले
औरंगाबादमध्ये अजिंठा-वेरुळखेरीज बिबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पर्यटकांना भेट द्यायला आवडतं. इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी औरंगाबाद विमानतळानजीक जवळजवळ आठ एकर जागेवर आपण एक उत्तम असं 'कलाग्राम' उभारलं आहे. राज्याबरोबरच देशातल्या विविध कला-संस्कृती-खाद्यसंस्कृती यांचा संगमच याठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पर्यटकांना एका छत्राखाली आपल्या विविधरंगी संस्कृतीचा, कलांचा आस्वाद घेता येईल. मनाजोगी खरेदीही करता येईल. लवकरच हे 'कलाग्राम' पर्यटकांच्या सेवेसाठी खुले करण्याचा आमचा मानस आहे.

'डेक्कन ओडिसी'चं मार्केटिंग
राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनं 'डेक्कन-ओडिसी' या लक्झरी ट्रेनचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. मी यापूर्वी पर्यटन मंत्री असताना या ट्रेनची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली सुध्दा. 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला होईपर्यंत ही रेल्वे सुरळितपणे सुरू होती. मात्र, या हल्ल्यानंतर अचानकपणे पर्यटकांचे आरक्षण रद्द करावे लागले. त्याच सुमारास रेल्वे मंत्रालयाकडूनही काहीशी असहकार्याची भूमिका घेण्यात आली. त्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र सध्या 'डेक्कन ओडिसी' सुरू असली तरी पुन्हा एकदा तिचं जोरदार मार्केटिंग करण्याची वेळ आली आहे.

'रायगडावर शिवसृष्टी साकारणारच!'
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि एकेकाळी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर 'शिवसृष्टी'चा विकास हे एक मी उराशी बाळगलेलं स्वप्न आहे. शिवकाळात जसे इथले नगारे वाजत असतील, बाजार भरत असतील, त्या काळात जशा इमारती असतील, अगदी तशाच साकारण्याचा माझा मानस आहे. इथं आलेल्या प्रत्येक पर्यटकाला आपण जणू काही शिवाजी महाराजांच्या राज्यातच आलो आहोत की काय, अशी अनुभूती मिळाली पाहिजे, असा हा प्रकल्प असेल. तथापि, पुरातत्त्व खात्याच्या अनेक कठोर नियमांचा अडथळा असल्यानं त्या कामात प्रगती झालेली नसली तरी माझे प्रयत्न सुरूच आहेत. रायगड पुन्हा एकदा जशाच्या तशा स्वरुपात उभा करण्यात एक ना एक दिवस मी यशस्वी होईनच, असा मला विश्वास आहे.
केवळ रायगडच नव्हे; तर, राज्यातले बहुतांशी प्रमुख किल्ले निवडून त्यांचा पर्यटन दृष्टीने विकास करण्यासाठी 'फोर्ट सर्किट योजना'ही आम्ही आखली आहे. यासाठी केंद्राकडे आम्ही पाठविलेल्या 50 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरीही प्राप्त झाली आहे. या प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी पर्यटकाला ऐतिहासिक अनुभूतीबरोबरच आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोल्हापूरसारख्या अनेक ठिकाणी वैभवशाली राजवाडे आहेत, पुण्याला शनिवारवाडा आहे; त्यांचंही जतन, संवर्धन करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येत आहेत. शनिवारवाडयाप्रमाणंच शक्य त्या सर्व ठिकाणी टप्प्याटप्प्यानं 'लाइट ऍन्ड म्युझिक शो' निर्माण करण्याचाही मानस आहे.

मित्रहो, योजना अनेक आहेत- संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून अनेक योजना, आराखडे आम्ही तयार करत आहोत. संगणकीकृत कार्यालयांच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग, आरक्षण आदी सुविधा उपलब्ध करीत आहोत. एलिफंटा महोत्सव, वेरुळ महोत्सव, बाणगंगा महोत्सव, कालिदास महोत्सव अशा अनेक महोत्सवांचं आयोजन करत आहोत. देशात, परदेशांत ठिकठिकाणी भरविण्यात येणाऱ्या पर्यटनविषयक प्रदर्शनांतून महाराष्ट्राच्या पर्यटनाचं जोरदार मार्केटिंग करत आहोत. पण मित्रांनो, या सर्व बाबतींत आपल्याला यश तेव्हा येईल, जेव्हा आपणा सर्वांचा सक्रिय प्रतिसाद आणि सहकार्य लाभेल.
राज्याच्या पर्यटनाला जगाच्या पर्यटन नकाशावर मानाचं स्थान मिळविण्यासाठी आपण सर्व जण प्रतिज्ञाबध्द होऊ या. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा 'अनलिमिटेड' पर्यटन विकास करणं शक्य आहे, असं मला वाटतं.
--

(महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या 'लोकराज्य' मासिकाच्या एप्रिल २०११ पर्यटन विशेषांकात प्रकाशित झालेली मुलाखत.)

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

सुट्टीची भटकंती...(२)

सुट्टीच्या पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिनेमा पाहून झाला...आठवडाभर पोटभर झोप झाली...पुढे काय? गावी मामाकडे जायचं की पुण्याला काकांकडे? असा प्रश्न पडला (तसं तर सगळ्याच नातेवाईकांनी सुट्टीत बोलावलं होतं) पण ठरवलं, की गावी जायचं...
ठरल्याप्रमाणे गावी मामाकडे गेलो. शहर आणि गावाच्या वातावरणात फरक पडतोच नां..। गावात बस पोहोचल्यानंतर बस-स्टँड पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर इतक्या सकाळी सुद्धा वर्दळ होती. स्टँडवर मामा घ्यायला आला होता. मामाच्या घरी जाताना वाटेत अनेकजण रामराम, नमस्कार करत होते. मनात विचार आले, खरंच किती छान..त्यानिमित्ताने संवाद तरी साधला जातो एकमेकांशी. नाहीतर, आमच्या मोठ्या शहरात अगदी घराच्या ओट्यावर बाहेर बसलेले शेजारी  तोंडातून चकार शब्द काढायला सुद्धा तयार होत नाहीत. पाहूणे म्हणून आलेल्या एखाद्या व्यक्तीने कोणाचा पत्ता विचारला तर केवळ हातानेच इशारा केला जातो किंवा खुणावले जाते. इथे तर पहा, अगदी सगळं वातावरणच जीवंत असल्यासारखं आणि चैतन्य असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मला नकळत हुरुप आला. कदाचित गावाच्या मातीचा आणि वातावरणाचा हा परिणाम असावा. मामाचा मोठ्ठा वाडा होता त्यामुळे आपल्या अपार्टमेंटमध्ये असलेल्या केवळ तीन खोल्यांची (वन् बीएचके) आठवण चटकन आली. वाड्यात दाराजवळच शेणाने सारवलेली जमीन, काढलेली छान मोठ्ठी रांगोळी, आजुबाजूला असलेली मोगरा, गुलाब, रातराणी, निशिगंध अशी कितीतरी फुलांची झाडं आणि अनेक झाडांना आलेला बहर यामुळे तर अगदी प्रसन्न वाटत होतं. अनेक दिवसांनी भाचा आला म्हणून मामीने सुद्धा औक्षण केलं, दूध-भाकरीचा तुकडा टाकला..घरात बॅग ठेवल्यानंतर सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला, आमच्या आजोबांना तर आश्चर्य वाटलं, की अजूनही हा नमस्कार करतो (अर्थात हे सगळे आई-वडिलांचे संस्कारच होते)...।
दोन दिवस छान गप्पा करण्यातच वेळ गेला. तिसर्‍या दिवशी मात्र थोडं बोअर झालं. मग, मामाने माझ्या समवयस्क मुलांशी ओळख करून दिली. कारण मामाचा मुलगा जॉबच्या शोधार्थ नशीब अजमवायला बाहेरगावी गेला होता. शिक्षण संपल्यानंतर पालकांसकट आजकाल मुलांना सुद्धा काहीतरी करण्याची जिद्द असते, इच्छा असते. आणि मध्यमवर्गीयांना तर याशिवाय गत्यंतरच नसते नां। मामाची शेती होती, परंतु मामाच्या मुलाला शेती करायची नव्हती, अर्थात मुलाने काहीतरी मोठ्या पदावर काम करावे अशी मामाचीही इच्छा होती. आमचे आजोबा सुद्धा नवीन आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करणारे असल्यामुळे नोकरी हा विषय फारसा महत्वाचा आणि जड नव्हता.
पण, मी खेळायला, हुंदडायला जाण्याऐवजी मामाबरोबर शेतात जायचा विचार पक्का केला. त्यानिमित्ताने शेतीची थोडी माहिती होईल, इतकेच..। दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळीच सातच्या आत शेतात पोहोचणार होतो...
(पुढील भाग उद्या...)

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

गौरव पुरस्काराचा...

नवी दिल्ली येथे गुरूवारी (२१ एप्रिल) अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समवेत.

विजय नाहाटा यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली येथे डीजीआयपीआर महाराष्ट्र चे महासंचालक विजय नाहाटा यांना आज (२१ एप्रिल) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार देताना.

विहंगावलोकन

उडुनी नभी उन्हात विहंग दमले पहा
दमुनी पंख्यावरी अहो बसलो मिनिटे दहा
जाहलो उष्म्याने अवघा बावळा..
आहे शुभ्र पंखा..काळा मी कावळा...

सुट्टीची भटकंती...

उन्हाळ्याच्या सुट्ट्या अनेक ठिकाणी लागल्या आहेत. काही ठिकाणी लवकरच लागतील. आता काय? किमान पंचेचाळीस दिवस म्हणजेच दीड महिना मज्जाच मज्जा...। मध्यंतरी वार्षिक परीक्षा असल्यामुळे आम्हाला आई-बाबांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू दिलं नव्हतं. तुझी परीक्षा झाल्यानंतर करायचं, ते कर..असं सांगून ते मोकळे झाले होते.
परीक्षा संपली आणि काय? दरवर्षाप्रमाणे आम्ही मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेलो. आजकाल तर मल्टीप्लेक्स असल्यामुळे सगळीच धमाल येते. तिकिटाचे पैसे जास्त द्यावे लागतात हे खरं असलं तरीही तिथे छान एअर-कंडीशन, पॉपकॉर्न, सूप, आईस्क्रीम, शेंगदाणे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या सोयी आतल्या आतच केलेल्या असल्यामुळे मध्यांतरात रस्त्यावर जायची गरज नाही. असंही रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते की रस्ता ओलांडताना अपघात झाला नाही म्हणजे सुटलो एकदाचा...असं म्हणून परत येऊन आपल्या चेअरवर बसून सिनेमा पहायचा. हो, एक मात्र आहे..पूर्वी चित्रपटगृहात असलेले उंदीर आजही मल्टीप्लेक्समध्ये आहेत. ए.सी. ची हवा खाऊन ते अजूनच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचीही नवीन पीढी आली असेल...
अनेक दिवसांपासून साचलेली झोप मी आता आठवडाभर घेणार आहे. नंतर गावाला जाण्याचा विचार करेन. पण गावाला नेमकं कुठे जाऊ? मित्रांबरोबर कुठेतरी ७-८ दिवसांसाठी जाऊ की नेहमीप्रमाणे गावाकडे, गावाला मामाकडे जाऊ? अशा द्विधा स्थितीत मी आहे. बघू या, काय प्लॅनिंग होतंय ते...। पुन्हा उद्या तुम्हांला मी भेटायला येईन..
नमस्कार!

सोमवार, १८ एप्रिल, २०११

वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित्यिक हरपला - छगन भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, दि. 17 एप्रिल : ज्येष्ठ साहित्यिक वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे मराठी विनोदी साहित्यसृष्टी समृध्द करणारा उत्कृष्ट साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठी विनोदी साहित्यात चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे यांच्यानंतर उदयाला आलेल्या रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ या विनोदी साहित्यिकांच्या पंक्तीमध्ये वि.आ. बुवा यांचाही अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. खुमासदार शैली, प्रासंगिक विनोद आणि अत्यंत साधी सोपी भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये होती. 'बुवा उवाच', 'परमेश्वराला रिटायर करा' आदी अनेक विनोदी कथासंग्रह, लेखसंग्रह, ललितसंग्रह, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी विपुल विनोदी लेखन केले. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या स्तंभलेखनालाही मोठी वाचकप्रियता लाभली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

रविवार, १७ एप्रिल, २०११

गुरुवार, १४ एप्रिल, २०११

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवादन

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, दि. 14 एप्रिल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीस भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
चैत्यभूमी येथे आज सकाळपासूनच आंबेडकरी जनतेच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी चैत्यभूमीचे दर्शन घेणाऱ्या मान्यवरांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री जयंत पाटील, मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव, खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, डॉ. राजेंद्र गवई, माजी आमदार संजय दत्त, महेंद्र साळवे, चंद्रकांत कसबे, नागसेन कांबळे आदींचा समावेश होता.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग नाक्यावरील चौकाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक चौक' असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमासही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी आंबेडकर यांच्याविषयी नरेंद्र वाबळे यांनी तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे आवश्यक - भुजबळ



मुंबई, दि. 14 एप्रिल : महाराष्ट्राची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे अत्यावश्यक आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (एमईडीसी) आणि अमेरिकास्थित लॅम्ब्डा-अल्फा इंटरनॅशनल (एलएआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'युज ऑफ लँड रिसोर्सेस इन द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात हा उद्धाटन समारंभ झाला.
विकासकामांमध्ये राजकारण आणण्याऐवजी विकासासाठी राजकारण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन हा अत्यंत मूलभूत व आवश्यक घटक आहे. शासन अथवा खाजगी विकासक या दोन्ही घटकांनी जमीनमालकांना विश्वासात घेऊन आपल्या सद्हेतूंविषयी त्यांची खात्री पटविली तर कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभारत असताना तो ज्या जमिनीवर उभा करण्यात येत आहे, त्या शेतकरी, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणास सर्वच संबंधितांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
यापुढील काळात राज्याची आर्थिक प्रगती खऱ्या अर्थाने साधावयाची झाल्यास सार्वजनिक-खाजगी भागीदारीला (पी-पी-पी) पर्याय नसल्याचे स्पष्ट करून श्री. भुजबळ म्हणाले की, केवळ शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून पायाभूत सुविधा विकासाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेणे आणि विहित मुदतीत पूर्ण करणे अशक्य असते. त्यामुळे 'पीपीपी' तत्त्वावर प्रकल्प उभारणेच अधिक उपयुक्त ठरते. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 2749 कोटींची तरतूद करण्यात आली असताना अजघडीला राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प खाजगीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत. केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून राहिल्यास यातला एखादा प्रकल्पही निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत 'एमईडीसी' व 'एलएआय' यांच्यात 'आर्थिक विकासासाठी जमिनीचा वापर' यासंदर्भात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला निश्चितपणे लाभ होईल, अशी आशा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुरवातीला 'एमईडीसी'चे अध्यक्ष विठ्ठल कामत यांनी प्रास्ताविक केले. अमेरिकन कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिकविषयक प्रमुख रॉबर्ट कार्लसन यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमास 'एलएआय'च्या अध्यक्ष डॉ. कॅरन सिएरॅकी, राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी, एमईडीसीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. डॉ.सी.एस. देशपांडे यांनी आभार मानले.

राज्यात 3 लाख 36 हजार किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट- भुजबळ

मुंबई, दि. 13 एप्रिल : राज्याच्या रस्ते विकास योजना 1981-2001ची मुदत संपली असल्याने रस्ते विकासाचा पुढील 20 वर्षीय आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यानुसार 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत दिली.
सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या सन 2011-12च्या अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7880.71 कोटी रुपयांच्या 11 मागण्या मंजुरीसाठी असून यापैकी 3812.68 कोटी रुपयांच्या मागण्या योजनांतर्गत तर 4068.03 कोटी रुपयांच्या मागण्या योजनेतर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, राज्याच्या सन 2001-21च्या नूतन रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किमान एका बारमाही रस्त्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 1,09,000 कोटी रुपये एवढया निधीची आवश्यकता भासणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेतून उपलब्ध होणारा अल्प निधी विचारात घेता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाबार्ड कर्जसहाय्य, केंद्रीय मार्ग निधी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन समिती इत्यादी योजनांच्या माध्यमातून तसेच खाजगीकरणाच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2011-12मध्ये रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये एकंदरीत 2749 कोटी रुपयांचा नियतव्यय प्राप्त झाल्याची माहिती देऊन श्री. भुजबळ म्हणाले की, या निधीमधून केंद्रीय मार्ग निधीसाठी 435 कोटी रुपये, नाबार्डसाठी 500 कोटी रुपये, खाजगीकरणातील शासन सहभागासाठी 150 कोटी रुपये, राज्यमार्गावरील कामांकरिता 795 कोटी रुपये, जिल्हा व इतर कामांसाठी 706 कोटी रुपये, साकवांसाठी 17.76 कोटी रुपयांची तसेच राज्य रस्ते विकास महामंडळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विभागाच्या निवासी इमारतींसाठी 22.96 कोटी आणि शासकीय इमारती, विश्रामगृहे यांच्यासाठी 104 कोटी अशी एकूण 127 कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती देताना श्री. भुजबळ म्हणाले, सध्या राज्यात 669 किलोमीटर लांबीची 2838 कोटी रुपये किंमतीच्या राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 3049 किलोमीटर लांबीची 19,000 कोटी रुपयांची चौपदरीकरणाची कामे मंजूर अथवा प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सहापदरीकरणाची 413 किलोमीटर लांबीची 4762 कोटी रुपये किंमतीची कामे प्रगतीपथावर आहेत. यात सूरत-दहिसर, पुणे-सातारा-कागल राज्यहद्द, गोंदे-नाशिक-पिंपळगाव या कामांचा समावेश आहे. राज्यातील एकूण 4327 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांपैकी 3478 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण वा सहापदरीकरण 21,937 कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. खाजगीकरणातून राज्यात 1923 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे 9305 कोटी रुपयांचे प्रकल्प नियोजन स्तरावर असून खाजगीकरणाच्या माध्यमातून जे प्रकल्प पूर्णत: सुसाध्य होत नाहीत, अशा 1262 किलोमीटर लांबीच्या 4736 कोटीच्या 15 प्रकल्पांमध्ये शासनाने आर्थिक सहभाग देण्याचे ठरविले आहे. यासाठी 1847 कोटी रुपयांचा एकूण निधी शासन सहभाग म्हणून मंजूर करण्यात आला असून यातील 854 कोटी एवढी रक्कम केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या कामाच्या प्रगतीविषयीही श्री. भुजबळ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील काम येत्या दोन महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे. कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम मागे ठेवण्यात येणार असले तरी त्यावर आता भुयारी मार्गाच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील मार्गाचा सुसाध्यता अहवाल येत्या महिन्याभरात मिळेल. त्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास एक वर्ष लागेल. झाराप ते पत्रादेवी या टप्प्यातील मार्गाचे काम समाधानकारकरित्या सुरू असून 183 कोटी रुपयांपैकी 157 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत.
राज्यात सप्तशृंगीगड व हाजी मलंग गड या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून जेजुरी गड आणि माहूर गड येथील कामांना लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सागरी महामार्गाच्या एकूण 786 किलोमीटर लांबीपैकी 759 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, या महामार्गावरील एकूण 51 पुलांपैकी 41 पुलांचे काम पूर्ण झाले असून 4 पुलांची कामे मंजूर झाली आहेत. उर्वरित सहा पुलांची व सुटलेल्या लांबीची (Missing Link) काम पूर्ण करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बाणकोट, काळेश्री व धरमतर खाडी तसेच 10 किलोमीटर लांबीची मिसिंग लिंक असा एकूण 504 कोटी रुपये एवढया किंमतीचा प्रस्ताव नाबार्डकडे प्रस्तावित केलेला असून त्यापैकी बाणकोट खाडीवरील 297 कोटी रुपये किंमतीच्या कामास नाबार्डने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2440 कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामधून सुमारे 5171 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. 443 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत 435.50 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून त्यातून 850 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाबार्ड कर्जसहाय्यित रस्ते विकासासाठी आतापर्यंत 2712 कोटी रुपयांचे कर्जसहाय्य प्राप्त झाले असून त्यातून 17,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

पर्यटनासाठी 215 कोटी रुपयांची तरतूद
राज्याच्या पर्यटन विकासासाठी यंदा 215 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी प्रादेशिक विकास योजनेसाठी 180 कोटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी 25 कोटी आणि केंद्र पुरस्कृत राज्य शासनाच्या सहभागासाठी 10 कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.
जगातल्या लक्झरी ट्रेनपैकी एक उत्कृष्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या राज्यात पूर्ववत सहली सुरू होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असून सात दिवसांच्या मोठया सहलींऐवजी दोन-तीन दिवसांच्या छोटया सहली चालविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लोणार सरोवरात मंगळावरील विषाणूंप्रमाणे विषाणू सापडल्याची माहिती आजच प्रसिध्द झाली असून तज्ज्ञ समिती नेमून त्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कोकणच्या पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 225 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला ही बाब खरी असली तरी येत्या वर्षभरात त्यातला जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या 225 कोटी रुपयांमध्ये मुंबई व एमटीडीसीसाठी 33.5 कोटी, ठाणे जिल्ह्यासाठी 18.89 कोटी, सिंधुदुर्गसाठी 70.90 कोटी, रत्नागिरीसाठी 36.86 कोटी आणि रायगड जिल्ह्यासाठी 24.60 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

बुधवार, १३ एप्रिल, २०११

भूकंपांमुळे जपानवर किरणोत्सर्गाचा धोका वाढतोय

११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपानंतर सावरण्याच्या बेतात असलेल्या जपानवर पुन्हा एकदा निसर्गाची कुर्‍हाड कोसळली आहे. एक महिन्याने म्हणजेच ११ एप्रिलला देखील येथे भूकंप झाला, परंतू ६.३ रिश्टर स्केल झाल्यामुळे त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतू फुकूशिमा मधील किरणोत्सर्गाची पातळी दररोज वाढतच असून आता ७ झाली आहे. विविध अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये देखील किरणोत्सर्ग वाढल्यामुळे नागरीकांचा हा चिंतेचा विषय बनला आहे. विविध कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची तपासणी देखील विशेष उपकरणांद्वारे करण्यात येत असून बाजारात सुद्धा उपकरणांच्या सहाय्याने भाज्यांची तपासणी केली जात आहे. अणूप्रकल्पाच्या सुमारे चाळीस किलोमीटर परीसरातील लोकांना आणखी दूर पाठविण्याचे नियोजन सरकार करणार आहे.

आता फक्त हल्ला...

26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारचाच हात असल्याची कबूली अमेरिकेत सध्या ताब्यात असलेल्या तहव्वूर हुसेन राणा याने दिली आहे. मुंबई हल्ल्याचे कारस्थान पाकिस्तान सरकार आणि "आयएसआय' या गुप्तहेर संघटनेच्या पुढाकाराने रचण्यात आले अशी कबूली राणा याने नुकतीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राणा याच्या विरुद्ध मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल खटला अमेरिकेच्या एका न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आपल्या बचावासाठी तो महत्वाची कागदपत्रं सादर करणार असून येत्या १६ मे स खटला सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आतापासूनच उभारण्यात आली आहे.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

50th Anniversary of the first Human SpaceFlight (12 Apr. 1961)

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
युरी गागारिन
युरी अलेक्सेइविच गागारिन ९ मार्च, इ.स. १९३४ - २७ मार्च, इ.स. १९६८ हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता.

युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.

वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.
(सौजन्य- इंटरनेट)

सोमवार, ११ एप्रिल, २०११

महात्मा फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात सुमनांजली

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विधान भवनाच्या आवारातील पुतळ्याला आज मान्यवारानी सुमनांजलि वाहिली. विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष वसंत पुरके, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री मधुकर चव्हाण, मुख्य सचिव अनंत कळसे आदी यावेळी उपस्थित होते.

'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 11 एप्रिल :  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील 'दै. विश्वरुप'ने काढलेल्या 'महात्मा' या विशेषांकाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सकाळी प्रकाशन करण्यात आले. श्री. भुजबळ यांच्या 'रामटेक' निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तरुण पिढीला महात्मा फुले यांच्या कार्याची महती व माहिती ज्ञात करुन देण्याच्या दृष्टीने 'दै. विश्वरुप'ने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या विशेषांकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संपादक सतीश धारप यांनी सांगितले की, 'दै. विश्वरुप'च्या या विशेषांकात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री सुनिल तटकरे, प्रा. हरि नरके, नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांचे लेख आहेत.

बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्रकार हरपला: भुजबळ

मुंबई, ता. ११ - ज्येष्ठ पत्रकार बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे आपण एका जुन्या स्नेह्याला आणि वृत्तपत्रसृष्टी ज्येष्ठ जागरूक पत्रकाराला कायमची अंतरली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
बाळ देशपांडे हे पत्रकारितेच्या क्षेत्रातले दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या देशपांडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समतोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारांच्या हक्काबद्दल ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या निधनामुळे तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान


कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रतिष्ठानाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानला ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गंगापूररोड वरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने कार्यवाह लोकेश शेवडे, उपाध्यक्ष रंजना पाटील व कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा धनादेश स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी पी.वेलरासू, उपविभागीय अधिकारी निलेश सागर, कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास लोणारी, प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, विश्वस्त विनायक रानडे, उपकार्यवाह विनायक जोशी, आर्किटेक्ट संजय पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचा संच भेट दिला तर श्री. लोणारी यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह पालकमंत्र्यांना देवून त्यांचे स्वागत केले.
महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानाच्या निमित्ताने श्री. भुजबळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शेतकर्‍यांना शेत तळ्यासाठीच्या चेकचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी अभियानास शुभेच्छा दिल्या. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, जिल्हाधिकारी पी.वेलरासू, येवला पंचायत समिती सभापती आर. डी. खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापू काळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास मोते, निफाड व चांदवड येथील उपविभागीय कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Good Morning...सुप्रभातम् ।

9 एप्रिल 2011 ला धावत्या बसमधून ओझरनजीक सूर्योदयाचे मोबाईलद्वारे घेतलेले छायाचित्र

रविवार, १० एप्रिल, २०११

आधी हवेत...नंतर पोटात...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
इंदूर म्हणजे मध्यप्रदेशचे पुणेच...इथेही खवैयेगिरीची अजिबात कमतरता नाही..देणाराने देत जावे..घेणाराने घेत जावे..या उक्तीप्रमाणे राजवाडा परीसरात जवळपास दररोज रात्रीचे चित्र दिसते. जसजसा सराफा बंद होण्याची वेळ जवळ येते तसतशी सराफा दुकानांपुढे विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटणे सुरू होते. मनच्युरिअन पासून अगदी पाणीपुरी, कचोरी, समोसा, खमण, मसाला डोसा, दहीवडा असे नाना पदार्थ समोर दिसल्यानंतर खाण्यासाठी कोणीही जीभेवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. खिशाचा आणि घशाचा अजिबात विचार न करता खाण्यासाठी हात सरसावतात. बस्स. हाता-तोंडाची गाठ..। सराफा परीसरात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या जोशी वडेवाल्यांच्या दुकानासमोर तर रीघ लागलेली असते. दहीवडा तयार करताना लहरीप्रमाणे हा वडा किमान पाच ते सहा फूट हवेत उडवून नंतर तळणासाठी तेलात बुडवला जातो. तयार झाल्यानंतर पट्टकन कोणाच्या पोटात नाही गेला, तरच नवल..।
ओमप्रकाश जोशी यांचे वडील रामचंद्र जोशी यांनी 1961 मध्ये कचोरीचे दुकान सुरू करून 1978 मध्ये दहीवडे तयार करणे सुरू केले. अल्पावधीतच चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा त्यांच्या हाताला आणि वडा तयार करण्याच्या हातोटीला दाद दिली. सराफ्यामध्ये गेल्यानंतर जोशी यांचा दहीवडा न खाणे म्हणजे मंदीरात जाऊन घंटेला स्पर्श न करण्यासारखे आहे. दहीवड्यावर घालायचे दही तयार करताना दह्यासाठी साय काढली जात नसल्यामुळे हे दही सुद्धा चवीला मधुर लागते. मूग आणि उडिद यापासून तयार करण्यात येणाऱ्या या दहीवड्यात कोथिंबीर, जीरं, लवंग, तिखट, मिरची चवीनुसार घातली जाते...
(दर रविवारी, इंदूरच्या खवयैगिरीविषयी एखादा विषय देण्याचा मनोदय आहे...याबाबत आपल्याला काय वाटतं, ते कृपया आपली टिप्पणी (comment) लिहून प्रतिसाद द्या.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्तावित: भुजबळ

मुंबई, ता. ८ (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या चोपदरीकरणाच्या कामामध्ये पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याबाबत गेले वर्षभर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही काही निष्पन्न न झाल्याने या वनविभागातील हद्दीपुरता भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले.
सर्वश्री सुभाष देसाई, भरतशेठ गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, रवींद्र वायकर, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत, सूर्यकांत दळवी, विजय शिवतारे, महादेव बाबर या सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेसंदर्भात निवेदन करताना श्री. भुजबळ बोलत होते. महाड-संगमेश्वर येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलची कामे गतीने सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरला परवानगी देत असतानाच त्याठिकाणी आवश्यक पदनिर्मिती तसेच आधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली. यावर, ट्रॉमा केअर सेंटर उभारतानाच त्यासाठीच्या फर्निचरसह अन्य वैद्यकीय सामग्रीसाठी तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन

मनमाड येथील वैशाली व महेश खरे निर्मित 'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ.

अण्णांच्या आंदोलनास वीक-एन्डचा लाभ होण्याची शक्यता...

लोक-पाल विधेयकाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतर समोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास या आठवड्याच्या वीक-एन्डचा (ता. ९ व १० एप्रिल) लाभ निश्चित होऊ शकतो. अण्णांचे सपोर्टर्स म्हणून युवक देखील मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. इतकेच नाही, तर बॉलीवुडमधील कलाकार देखील अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी कार्यालयांना वीक-एन्डची सुटी आहे. परिणामी या कार्यालयात नोकरी करणारे अनेक युवक या दोन दिवसात अण्णा हजारे यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे.

आसाम मध्ये सर्वत्र साजरा केला जाणारा "बिहु"..

आमच्या आसामच्या मित्राने दिलेली "बिहू" विषयी थोडक्यात माहिती...

प्रत्‍येक बिहू कृषि कलेन्‍डर के विशिष्‍ट अवसर पर पड़ता है। तीनों बिहू उत्‍सवों में सबसे आकर्षक, बसंत ऋतु का उत्‍सव 'बोहाग बिहू' अथवा रंगाली बिहू होता है जो मध्‍य अप्रैल में मनाया जाता है, जिससे कृषि ऋतु का प्रारम्‍भ होता है। बिहू असम के सबसे ज्‍यादा प्रचलित लोक नृत्य को दिया गया नाम है, जिसका सभी जवान व बूढ़े, अमीर व ग़रीब आनन्‍द लेते हैं। नृत्‍य बिहू उत्‍सव का अंग हैं, जो मध्‍य अप्रैल में पड़ता है। जब फ़सल कटाई होती है और जो लगभग एक महीने तक चलती है। इससे असम के कलेन्‍डर की भी शुरूआत होती है।

बिहू नृत्‍य युवा लड़के व लड़कियों द्वारा खुले मैदान में किया जाता है, तथापि वे आपस में नहीं मिलते हैं। पूरा गांव नृत्‍य में हिस्‍सा लेता है, चूंकि नर्तक घर-घर में जाते हैं। इस नृत्‍य की पहचान तेजी से क़दम उठाना, हाथों को उछालना व चुटकी बजाना तथा कूल्‍हे मटकाना है जो कि युवाओं के मनोभाव का द्योतक है। कलाकार कभी-कभी गीत गाते हैं। नृत्‍य धीमी गति से आरंभ होता है, और जैसे-जैसे नृत्‍य आगे बढ़ता है इसकी गति तेज़ होती जाती है। 'ढोल' की सम्‍मोहक थाप और 'पेपा' (भैंसे के सींग से बनी तुरही) इस नृत्‍य का अंग हैं। बिहू नृत्‍य करते समय पारंपरिक वेशभूषा जैसे धोती, गमछा और चादर व मेखला पहनना अनिवार्य होता है। बिहू नृत्‍य, इसके विभिन्‍न रूपों में, फ़सल कटाई के विभिन्‍न स्‍तरों पर व नए मौसम के आगमन पर भी किया जाता है। इसकी सबसे सामान्‍य रचना गोलाकार अथवा समानान्‍तर पंक्तियों में होती है। बिहू के नृत्‍य व संगीत द्वारा असम वासियों की जीवन शक्ति के सर्वश्रेष्‍ठ रूप का दिग्‍दर्शन होता है।

बिहू सिर्फ हिंदू और असमिया ही नहीं मनाते, असम का पूरा जनसमुदाय इसके रंगों में सराबोर हो जाता है। वैसे तो असम में सालभर के दौरान तीन बार इस उत्सव का आयोजन होता है। किंतू बोहाग बिहू ही इनमें सबसे प्रमुख है। इस दौरान पूरे राज्य के लोग ही नहीं, बल्कि पेड, पौधे, पहाड भी सजीव हो उठते है। पहले तो यह उत्सव पूरे एक महीने तक चलता था। लेकिन जिंदगी की आपाधापी ने अब इसे एक सप्ताह तक सीमित कर दिया है। बिहु की शुरूआत सबसे पहले कब हुई, इसका क हीं कोई साफ जिक्र नही मिलता। लेकिन समझा जाता है कि ईसा से लगभग साढे तीन हजार साल पहले इसका आयोजन शुरू हुआ।
बिहु के दौरान राज्य में जगह-जगह मंच बना कर सात दिनों तक बिहूगीत व नृत्य का आयोजन किया जाता है। लोग नए कपडे पहनते है। सरकारी दफ्तरों में भी छुट्टियाँ होती है। यह उत्सव अनूमन हर साल १४ अप्रेल से शुरू होता है। असमिया नववर्ष भी बिहू से शुरू होता है।

What is "Jan Lokpal Bill"?

So many visitors of "Lekhani" Blog, were demanding that they want to know about "Jan Lokpal Bill". As per this demand, here tried to give few information for the same, through courtesy of internet and sources:


Jan Lokpal Bill
In India, the Jan Lokpal Bill (Citizen's ombudsman Bill) is a draft anti-corruption bill that would create a Jan Lokpal, an independent body like the Election Commission, which would have the power to prosecute politicians and bureaucrats without government permission.

The bill was drafted by Shanti Bhushan, former IPS Kiran Bedi, Justice N. Santosh Hegde, advocate Prashant Bhushan, former chief election commissioner J. M. Lyngdoh in consultation with the leaders of the India Against Corruption movement and the civil society. The bill proposes institution of the office of Lokpal (Ombudsman) at center and Lok Ayukta at state level. The Jan Lokpal Bill is designed to create an effective anti-corruption and grievance redressal systems and to assure that an effective deterrent is created against corruption and to provide effective protection to whistleblowers.

The Lokpal Bill drafted by the government has failed to pass the Rajya Sabha for 42 years. The first Lokpal Bill was passed in the 4th Lok Sabha in 1969 but could not get through in Rajya Sabh. Subsequently, Lokpal bills were introduced in 1971, 1977, 1985, 1989, 1996, 1998, 2001, 2005 and in 2008. Yet none of these bills were ever passed.

The movement for Jan Lokpal Bill started due to the resentment because of the serious differences between the draft Lokpal Bill 2010 prepared by the government and the Jan Lokpal Bill prepared by the members of this movement, which has received significant public support. Supporters of the bill consider existing laws to be too weak and insufficiently enforced to stop corruption.

Protests:
A group of Delhi residents dressed in white shirts and t-shirts took a four-hour drive around the city on March 13, 2011 to support a campaign against corruption and the Jan Lokpal Bill.

On April 5, 2011, anti-corruption activist Anna Hazare began a fast unto death till Jan Lokpal Bill enacted Around 6,000 Mumbai residents also started a one-day fast to support the demand for implementation of the Jan Lokpal Bill. Protesters have chosen yellow as the color of protests. They were seen wearing yellow dresses, T shirts and having yellow banners. Protesters in different cities are co-ordinating to observe Yellow Sunday.

Hazare also announced plans to start a Jail Bharo Andolan protest on 12th April, 2011 if the Jan Lokpal bill is not passed by the government. Hazare stated that his group has received six crore (60 million) SMSes in its support. He is further supported by a large number of Internet activists.

The protests are not political in nature. Political leaders were discouraged by Hazare supporters from joining in his protests, as Hazare indicated his belief that these parties were using the campaign for their own political advantage.
(this information & original may be vary)

कोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी प्रभावी प्रस्ताव सादर करा: भुजबळ

मुंबई, ता. ७ - कोकणात, विशेषतः सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीची मोठी क्षमता आहे. तसेच कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असे समुद्र किनारे आहेत. यामुळे जगभरातून पर्यटक यावेत यासाठी कोकणला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळावे, यासाठी पर्यटनविषयक मोजकेच परंतू प्रभावी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
बाराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या कोकणपट्टीतल्या चार जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित तसेच प्रगतीपथावरील कामांच्या सद्यस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्ह्यातील पर्यटन, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. या आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राला सन २००६ ते २०१० या तीन वर्षांच्या कालावधीत सागरी किनारा विकासाकरिता दरवर्षी ६२ कोटी ५० लाख रुपये यानुसार २२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ठाणे रु. १८ कोटी ८९ लाख, रायगड रु. २४ कोटी ८० लाख, रत्नागिरी रु. ५२ कोटी ५७ लाख, सिंधुदुर्ग रु. ८८ कोटी ९९ लाख आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ रु. ४५ कोटी ७३ लाख याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत श्रीवर्धन, गणपतीपुळे, माथेरान, नेरळ, किल्लेरायगड, मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, बाणकोट किल्ला, बागमांडला, लोटे-परशुराम, हर्णे-मुरुड, गुहागर, आंगणेवाडी, रांगणागड, तारकर्ली, सावंतवाडी, कुणकेश्वर, मालवण, मिठबाव, आंबोली, निवती भोगवे, जयगड इ. विविध ठिकाणी मंजूर तसेच प्रगतीपथावरील कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

तर विश्वचषकाविषयी वास्तव सहज सामोरे येईल...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या चषकाबद्दल सध्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पूर्वविजेत्या श्रीलंकेतून आलेला विश्वचषक अद्याप आपल्याच ताब्यात असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे. तर आयसीसी आणि बीसीसीआय ने विजेत्या भारतीय संघास देण्यात आलेला चषकच खरा विश्वचषक असल्याचे म्हटले आहे.
विविध वृत्तवाहिन्यांसह तज्ज्ञ मंडळी याबाबत विविध निष्कर्श काढत असून आयसीसी अध्यक्षांपासून कस्टम विभागाच्या वरिष्ठांपर्यंत सगळेच विविध विधाने करीत आहेत. हा चषक श्रीलंकेतून भारतात आणला गेल्यानंतर याची कस्टम ड्युटी २२ लाख रूपये देऊन चषक नेण्याबाबत सूत्रांना कळविण्यात आले होते. यानंतर विचाराअंती १५ लाख रूपये भरून चषक नेण्याबाबत कळविण्यात आल्याचे कस्टम विभागातर्फे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
वास्तविक इतका घोळ घालण्याऐवजी गत विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाच्या पदाधिकार्‍यांना पाचारण करून विश्वचषकाचे खरे-खोटे सहज करता येणे शक्य आहे. याशिवाय कस्टम विभागाने आपल्या विधानाची सत्यता पडताळून दाखविण्यासाठी चषक श्रीलंकेतून आल्यानंतरची तयार झालेली कागदपत्रं अथवा पावती लोकांसमोर ठेवून वास्तव सामोरे आणावे. विश्वचषक स्पर्धा होऊन तीन दिवस झाल्यानंतर देखील अद्याप विविध विधाने करणे कोणासही साजेशे नाही...

भुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्षिके!

म्हापसा, गोवा, दि. 4 एप्रिल : महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवर (बीचेस) जीवरक्षक सेवा सुरू करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या समता मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या श्री. भुजबळ यांनी आज सकाळी येथील सिंकेरी बीचवर कार्यरत असलेल्या 'दृष्टी लाइफगाड्र्स'तर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाची, त्यांच्या यंत्रणेची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, बीचवर आनंदासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यास जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर गोव्यामधील विविध बीचेसवर लाईफगाड्र्सच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता उत्तमरित्या जपली जात आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने आज या सिंकेरी बीचवरील लाईफगाड्र्सच्या कामकाजाची माहिती घेतली असता यंदाच्या मोसमात एकाही व्यक्तीचा बळी याठिकाणी गेलेला नाही, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. लाईफगाड्र्सच्या जलद प्रतिसादामुळे येथे शेकडो लोकांचे जीव वाचले. त्याचप्रमाणे स्थानिकांना प्राधान्याने उत्तम प्रशिक्षण देऊन लाइफगार्ड म्हणून रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकते, ही बाबही अधोरेखित झाली, असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी दृष्टी लाईफगाड्र्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वीरेंद्र कंवर आणि उपाध्यक्ष राजेश गर्ग यांनी श्री. भुजबळ यांना येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची सविस्तर माहिती दिली. जीवरक्षक दलातील सर्व सदस्य वॉकी-टॉकीद्वारे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतात. व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकजण बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सक्षम असून त्याला तातडीच्या मदतीसाठी जेट-स्की, हाय स्पीड क्राफ्ट अशा बोटी तैनात असतात. त्याचप्रमाणे जीवरक्षक दलाच्या जीपही तातडीच्या मदतीसाठी किनाऱ्यावर उपलब्ध असतात, अशी माहिती त्यांनी श्री. भुजबळ यांना दिली. एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे वाचवता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिकही भुजबळ यांना दाखविण्यात आले. त्यानंतर जीवरक्षक दलाकडे असणाऱ्या अत्याधुनिक साधनसामुग्रीची, जीवरक्षक दलातील सदस्यांसाठी कंपनीने उपलब्ध केलेली सुसज्ज व्यायामशाळा आणि त्यांच्या निवासव्यवस्थेचीही भुजबळ यांनी पाहणी केली.

सोमवार, ४ एप्रिल, २०११

संगम..शास्त्र - संस्कृतीचा...!!!

भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजयाने झालेला आनंद शब्दातीत- छगन भुजबळ

मुंबई, दि. 2 एप्रिल : महेंद्रसिंग धोणी याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकून सन 1983च्या विजयाची पुनरावृत्ती केल्यामुळे आपण अत्यंत हर्षभरित झालो असून आपल्याला झालेला आनंद शब्दातीत आहे. या ऐतिहासिक सोनेरी क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, हा माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.
आजच्या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने शतकांच्या शतकाचा टप्पा ओलांडला असता तर हा आनंद शतगुणित झाला असता. मात्र गौतम गंभीर याच्या 97 धावांच्या खेळीमुळे ही उणीव भरून निघाली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्णधार धोणीला या मोक्याच्या सामन्यामध्ये सापडलेला सूर आणि त्याने झळकावलेल्या मोलाच्या 91 धावा या सुध्दा संघाच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. युवराज सिंगने षटकार ठोकून विवविजेतेपदावर दिमाखात भारताचे नाव कोरले. एकूणच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाडयांवर भारतीय संघाने बजावलेली कामगिरी महत्त्वाची ठरली. भारतीय संघाचा आजचा विजय हा सांघिक कामगिरीचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू झालेच पाहिजे

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
म्हापसा, गोवा, दि. 3 एप्रिल : गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. गोवा मुक्तीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये गोव्यात इतर मागासवर्गीय समाजघटकांचे आरक्षण सध्याच्या 19 टक्क्यांवरुन वाढवून 27 टक्के करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केली. ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावून धरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा गोव्यातील पहिलाच मेळावा येथील बोडकेश्वर मंदिराच्या मैदानावर झाला. सुमारे पाच हजार समता सैनिकांची उपस्थिती लाभलेल्या या मेळाव्यास गोव्यातील विविध लहानमोठया सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
समता परिषद ही पूर्णत: पक्षविरहित काम करणारी संघटना असून तिच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय या बहुजन मागासवर्गीय समाजघटकांच्या विकासासाठी लढले पाहिजे, एवढी एकच असल्याची बाब भाषणाच्या सुरवातीलाच श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केली. त्याचप्रमाणे जातिनिहाय जनगणनेची आपली मागणी सुध्दा राजकीय हेतूने प्रेरित नसून ती सामाजिक उध्दारासाठीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतरही इतर मागासवर्गीयांची जनगणना होत नसल्यामुळे त्यांच्या विकासासाठी कोणताही विकास कार्यक्रम राबविणे अशक्य असल्याचा अभिप्राय 11व्या वित्त आयोगाच्या अहवालामध्ये नोंदविण्यात आला आहे. केवळ लोक संख्येचा आकडा माहिती नाही म्हणून इतर मागासवर्गीयांसाठी योजना आखणे, धोरण राबविणे, आर्थिक तरतूद करणे या गोष्टी अशक्य बनत आहेत. त्यामुळे इतर मागासवर्गीयांचा खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधावयाचा असेल तर जनगणनेशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आपण ही मागणी लावून धरली आणि केंद्राला तसा निर्णय घेण्यास भाग पाडले, असेही त्यांनी सांगितले.
इतर मागासवर्गीयांना शिक्षणाबरोबरच खाजगी उद्योगांत, न्यायव्यवस्थेत आणि विधानसभा व लोक सभेतही आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठीही समता परिषद आग्रही असल्याचेही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. बहुजन समाजाने आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी प्रस्थापितांविरोधात एकजुटीने लढा उभारण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
यावेळी गोव्याचे महसूलमंत्री जुझे फिलीप डिसूझा यांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी आपण भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ग्वाही दिली.
गोव्याचे पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही बहुजनांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या समता परिषदेने गोव्यात बहुजनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. भुजबळ यांचे आभार मानले.
गोव्याचे पंचायत व क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांनी फुले, आंबेडकर नसते तर आपण कधीही नगरसेवक, आमदार, मंत्री झालो नसतो, असे सांगितले. यापुढेही आपण पदावर असू अगर नसू, पण समाजाच्या उध्दारासाठी सतत कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
समता परिषदेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी बहुजनांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांनी समता परिषदेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
यावेळी बिहारचे खासदार उपेंद्र कुशवाहा, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, बापू भुजबळ, गोव्याचे माजी मंत्री काशीनाथ जल्मी, चंद्रकांत चोडणकर, बापू मडकईकर, दत्ताराम चारी, सखाराम कोरगावकर, महादेव जाधव, सुभाष कलगुटकर, लक्ष्मण कवळेकर, नारायण कामत आदी उपस्थित होते. 

रविवार, ३ एप्रिल, २०११

विश्वचषक अपेक्षेनुसार भारताकडे- सचिनचं स्वप्न साकार



जल्लोष विजयाचा...

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर विश्वचषक 2011 चा प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारतीय संघाने आज अपेक्षेप्रमाणे खेळून अखेर देशाला विश्वचषक मिळवून देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. क्रिकेटचा जगज्जेता सचिन तेंडुलकर याचं विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संपूर्ण संघाने पूर्ण केले. प्रत्येक सामन्यातच अभूतपूर्व खेळणाऱ्या युवराजसिंह उर्फ युवी याला मॅन ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आले. 1983 नंतर प्रथमच 2011 मध्ये भारत विश्वविजेता ठरला आहे.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पन्नास षटकात लंकेने 274 धावा करून विजयासाठी भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले. भारत आणि श्रीलंका संघात विश्वचषकासाठी चुरशीच्या स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय प्राप्त करून विश्वचषक मिळविला. वीरेंद्र सहेवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर, आता पुढे काय? असे वाटत असतानाच गौतम गंभीरने दमदार धावा करून भारताला सुस्थितीत नेले. तत्पूर्वी मुथैया मुरलीधर याच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात संगकाराच्या हातून झेल सुटल्याचा फायदा गंभीरने घेऊन दिवसीय सामन्यातले आपल्या 4,000 (चार हजार) धावा पूर्ण केल्या. विराट कोहली याने रणदिवच्या चेंडूवर चौकार मारून भारताच्या 100 धावा पूर्ण केल्या. यानंतर 35 धावांवर कोहली खेळत असताना दिलशान याने त्याचा झेल घेतला. गंभीर 97 धावांवर खेळत असताना परेरा याच्या चेंडूवर तो बाद झाला.
सेहवाग, तेंडुलकर आणि कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. अत्यंत स्थिर बुद्धीने निर्णय घेण्यात सर्वश्रृत असलेल्या धोनीने आज खरोखर कर्णधाराला साजेशी खेळी खेळून अवघ्या 79 चेंडूंमध्ये 91 धावा पूर्ण केल्या. त्याला युवराजसिंग याने सुरेख साथ दिली. धोनी 91 धावांवर आणि युवराजसिंग 21 धावांवर नाबाद राहिले. विजयासाठी 40 धावांची गरज असतानाच देशात भारताचा विजय निश्चित झाला आणि नागरिकांनी बाहेर पडून आतषबाजी करण्यास सुरवात केली.
विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न साकार- सचिन
आपल्या शंभर धावांची शंभरी गाठण्याचं स्वप्न साकार झालं नाही याचं दुःख वाटलं, परंतू विश्वचषक मिळवण्याचं आपलं स्वप्न धोनी आणि सहकाऱ्यांनी पूर्ण केल्याचा आनंद सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला. आपल्या कारकीर्दीत आजचा दिवस सगळ्यात आनंदाचा आणि महत्त्वाचा असल्याचं सचिनने म्हटले आहे.
महिनाभरापासूनच तयारी- धोनी
टीम इंडियाचे 28 वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झालं असून गेल्या महिनाभरापासूनच आम्ही विश्वचषक जिंकण्याची तयारी करत होतो. सचिन सारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन आणि अगदी ड्रेसिंग रूम, रेस्ट रूम, मैदानात देखील आम्ही सतत विश्वचषक मिळवण्याची चर्चा आणि नियोजन करत होतो त्याचा फायदा झाल्याचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सांगितले.
हा विश्वचषक मिळण्यात सर्व चहाते, मार्गदर्शक यांच्या शुभेच्छा असल्याचे हरभजनसिंग आणि विराट कोहली याने सांगितले.
दरम्यान विश्वचषक जिंकल्यानंतर हरभजनसिंग आणि युवराज यांनी आपल्या आनंदाश्रृंना विश्वचषक पाहण्यासाठी बाहेर येण्यास वाट मोकळी करून दिली.
प्रत्येक खेळाडूस 1 कोटी
बीसीसीआय कडून भारतीय संघातील प्रत्येकाला एक कोटी रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला छत्तीसगड रत्न पुरस्कार तसेच भारतीय संघातील प्रत्येक सदस्याला एक प्लॉट देण्यात येणार आहे.
रात्री उशीरापर्यंत देशात ठिकठिकाणी नागरिक हातात राष्ट्रध्वज घेऊन विश्वचषक जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते.

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

आला उन्हाळा...मुलांना सांभाळा...

सर्वत्र उन्हाळा सुरू झाला असून, काही भागात मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काही ठिकाणी लवकरच लागणार आहेत. परिक्षा संपल्यानंतर पालक आणि मुलं दोघेही...सुटलो बुवा...असा सुटकेचा निश्वास सोडतात. मुलं सुद्धा दिवसभर खेळतात, हुल्लडबाजी करतात, मस्ती करतात, मामा, काका, आजोळी जाण्याचे प्लॅन होतात आणि जातात. मुलांचं हे वयंच खेळण्याचं आहे, त्यांना बिनधास्त खेळू द्या, त्याशिवाय त्यांच्या शरीराची चांगली वाढ कशी होणार? मुलांना अगदी माती, रेतीतही खेळू द्या, किंबहुना क्रिकेट खेळताना चेंडू घाणीच्या ठिकाणी पडला तरीही तिथून चेंडू काढू द्या...फक्त यानंतर घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला सांगा आणि तशी खात्री करा. दुपारी खेळताना सावलीत अथवा घराच्या पडवीत, ओसरीवर, वाड्यात सावली देणार्‍या झाडाखाली बसून खेळायला, शक्यतो बैठे खेळ खेळायला सांगा. अनेक मुलांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास सुद्धा होतो, यासाठी मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..उन्हाळ्यात बाजारपेठेत येणारी टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी अशी वेगवेगळी फळं नक्की द्या...आपण स्वतः सुद्धा मुलांबरोबरच उन्हापासून बचावाची काळजी घ्यायला विसरू नका!

रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार


मुंबई, ता. १ - शेतकर्‍यांना शेतीसाठी रात्री दहा तास अखंडितपणे वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पासंबंधातील विरोधकांच्या शंकांचे निरसन करताना अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान व्यत्यय आणणार्‍या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले, की शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीच्या हातात अर्थ आणि उर्जा खाते असल्यामुळे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांचे हित बघणारे आहे. शेतकर्‍यांना काळ्या आईची इमान-इतबारे सेवा करता यावी याकरिता त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याज दर, तर ५० हजार ते ३ लाख रुपयांपर् यंत फक्त २ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. राज्यातील भारनियमन संपून वीजेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी जैतापुर सारख्या वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करताना त्यामध्ये राजकारण आणणे गैर आहे.

राज्याने ओव्हरड्राफ्ट घेतला आहे, या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाचे खंडन करताना ते म्हणाले की, आघाडी शासनाने २००५ सालानंतर एकदाही ओव्हरड्राफ्ट घेतला नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती युतीच्या काळापेक्षा चांगली आहे. राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात दिलेला शब्द मार्च २०१२ पर्यंत पूर्ण करता आला पाहिजे ही त्यापाठीमागची भूमिका आहे. राज्याने मागील वर्षाची महसूली तूट भरून काढल्यामुळेच यावर्षी शिलकीचे अंदाजपत्रक सादर करू शकलो आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचा गाडा योग्य दिशेने हाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील विकासाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी मागासलेल्या तालुका आणि जिल्ह्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. वार्षिक जिल्हा आराखड्याला वाढीव निधी देण्यात आला आहे. आमदारांचा विकास निधी देखील दीड कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपये करण्यात आला आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...