मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Mahaganapati लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पनवेलचा महागणपती मंडप 'श्रीगणेशा'; अध्यक्ष कडू यांच्या हस्ते शुभारंभ

 पनवेल: (ता. १०) कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य मंडप उभारणीला सोमवारी (ता. १०) श्रीगणेशा झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मंडप उभारणीचा श्रीफळ वाढविण्यात आला. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन रुग्णालयासमोरील गुजराथी शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडप उभारण्यात सुरुवात झाली आहे. रायगड, नवी मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात ‘पनवेलचा महागणपती’ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. भव्य राजवाडा, आकर्षक विद्युत रोषणाई, सुबक सजावट आणि १८ ते २१ फुटांची गणेशमूर्ती हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अकरा दिवसांच्या उत्सवादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच मंडप उभारणी कधी सुरू होणार, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता असते. यंदाही वेगळे आकर्षण असणार आहे अशी माहिती अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली. यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मंडपाच्या उभारणी...