नागपूर, ता. ११ - नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली वाहण्यात आली. सिद्धारुढ शिवमंदीर, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. यावेळी सद्गुरुदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्विकर आणि शरदराव पुसदकर यांनी दत्ताभैयांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उदयन ब्रह्म यांनी सूत्रसंचालन केले. मायाताई मानकर, आनंद तायडे, डॉ. मेघाताई बालंखे, प्रकाश बारापात्रे, सुधाकरराव इंगोले, किसोर गलांडे, पद्माकर जोशी यांनी आपले विचार मांडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.