कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या ८१० घरांसाठी दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. २६ एप्रिल २०२० रोजी www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल. तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४,८३८ परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प...