"लाजरी" च्या या लाजण्याने लाजाळू ही लाजले..लाजरीशी खेळताना समजलंच नाही, बारा केव्हा वाजले...! फूल तिच्या लाजण्याने खुदकन हसले..इतक्यात येऊन छोटेसे फुलपाखरू बसले.. लाजता लाजता लाजरी होऊ लागली मोठी...सुचले हो शब्द बघा आणि आले इथे ओठी... फिरताना बागेत तिला बघून बहरला चाफा..नकळत चिउताईने घेतला तिचा पापा...!!! माझा मित्र संदीप पारोळेकर (दै. लोकमत वेबसाइट पुणे- उपसंपादक) त्याच्याकडे एक छानशी चिमुकली पाहूणी आली आहे..तिचे नाव "लाजरी" ठेवले आहे..त्याने ही आनंदवार्ता सांगताना सुचलेल्या-उपरोक्त चार ओळी..!!