मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गुलाबी थंडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिल्ली येथे विमानसेवा पूर्वपदावर

नवी दिल्ली ता. 21 - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवा पुन्हा पूर्व पदावर आली. गेले दोन दिवस दाट धुक्यामुळे येथील विमानसेवा विस्कळीत झाली होती. आज धुके होते परंतु दृश्यमानता चांगली असल्यामुळे धुक्याचा विशेष प्रभाव न पडता कोणतीही विमानसेवा विस्कळीत झाली नाही. आज दृश्यमानता सुमारे 200 मीटर होती असे सूत्रांनी सांगितले. विमानोड्डाण सेवा गेले दोन दिवस विस्कळीत होऊन जवळपास 200 विमानांच्या सेवेवर याचा विपरीत परिणाम होऊन विमानांना 2 ते 8 तास विलंब झाला होता, 28 विमाने रद्द करावी लागली होती तसेच 19 विमानांचा मार्ग बदलविण्यात आला होता. दरम्यान इंदूर येथे देखील धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता.

मध्य प्रदेशात गुलाबी थंडीची चाहुल...

गेल्या महिन्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा थंडी उशीरा पडते की काय? असा विचार डोकावत असतानाच मध्य प्रदेशात दोन दिवसापासून हवामानात बदल झाला आहे. काही भागात सकाळी धुके दिसत असून वाहनांवर दव पडलेले दृश्य सकाळी दिसते. नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणार्‍या लोकांच्या अंगावर स्वेटर, मफलर, कानटोपी तर महिलांच्या अंगावर शाल दिसत आहे. पारा देखील खाली घसरला असून रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. गुलाबी थंडीत पहाटे फिरायला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी देखील आता पावसाळा संपला असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.