मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उच्च शिक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राजकारणी होण्यासाठी निश्चित शिक्षण अनिवार्य करण्याची गरज...

प्राध्यापक होण्यासाठी यापुढे नेट परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होणार असून याप्रमाणेच राजकारणात देखील निश्चित स्वरूपाचे शिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे. देशातील निरक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी केवळ इयत्ता दहावी मॅट्रिक उत्तीर्ण किंवा दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जात होते. अर्थात तेव्हा परिस्थिती देखील तशीच होती. परंतु सातत्याने होणारा विकास, शिक्षणासाठी शासनाने उचललेली पावलं, बदललेलं समाज-मन यामुळे आज निरक्षरतेचे प्रमाण कमी होऊन साक्षरता वाढली आहे. काही ठिकाणी आजही रात्रशाळांमध्ये अभ्यासवर्ग घेतले जातात. काळाच्या ओघात दहावीचे शिक्षण म्हणजे नाममात्र शिक्षण झाले असून आता उच्च शिक्षा विभूषित व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते. पूर्वीचा "गावचा पोर्‍या" आता गावात साहेब होऊन कर्तव्य बजावतोय, परदेशात सेवा देऊन गावाचे, देशाचे नाव उज्ज्वल करतोय. पूर्वीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सुद्धा आता पूर्णपणे शंभराच्या घरात पोहोचली आहे. ५०% गुण म्हणजे भरपूर झाले... असा समज आता गैर झाला आहे. आता प्रचंड स्पर्धा असून ९०%, ९५%, ९९.९९% गुण प्राप्त करणार्‍या विद