मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जातिनिहाय जनगणना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर

नाशिक, ता. १ - देशातील जातिनिहाय जनगणना सन २०११ च्या मुख्य जनगणनेनंतर म्हणजेच जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. श्री. भुजबळ यांनी २७ जुलै २०१० रोजी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) जातिनिहाय जनगणनेच्या संदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले होते. नियोजन आयोगाने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात ओबीसी जनगणनेची शिफारस केल्याचा दाखलाही पत्रात दिला होता. हे पत्र पंतप्रधान कार्यालयामार्फत पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृहविभागाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या सामाजिक अध्ययन प्रभागाकडे पाठविण्यात आले होते. यानुसार असिस्टंट रजिस्ट्रार जनरल श्रीमती प्रतिभा कुमारी यांचे उपरोक्त माहिती देणारे पत्र आपल्याला नुकतेच प्राप्त झाले असल्याचे खासदार भुजबळ यांनी सांगितले. जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्याने करावयाच्या जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पत्रात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर देखील आपल्याला