मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वि. आ. बुवा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित्यिक हरपला - छगन भुजबळ

  मुंबई, दि. 17 एप्रिल : ज्येष्ठ साहित्यिक वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे मराठी विनोदी साहित्यसृष्टी समृध्द करणारा उत्कृष्ट साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठी विनोदी साहित्यात चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे यांच्यानंतर उदयाला आलेल्या रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ या विनोदी साहित्यिकांच्या पंक्तीमध्ये वि.आ. बुवा यांचाही अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. खुमासदार शैली, प्रासंगिक विनोद आणि अत्यंत साधी सोपी भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये होती. 'बुवा उवाच', 'परमेश्वराला रिटायर करा' आदी अनेक विनोदी कथासंग्रह, लेखसंग्रह, ललितसंग्रह, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी विपुल विनोदी लेखन केले. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या स्तंभलेखनालाही मोठी वाचकप्रियता लाभली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.