सिडको नवी मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिडको नवी मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत

विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७७९ घरांसाठी एकूण ४,१८० अर्जदारांनी स्वारस्य नोंदविले

आहे. ही घरे नवी मुंबईतील तळोजा, खारघर आणि कळंबोली या नोड्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली

आहेत.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) घरे

उपलब्ध करून देण्यात आली असून, पात्र नागरिकांना नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी

मिळाली. ३ सप्टेंबर २०२६ रोजी बुकिंगची मुदत संपली असून, नागरिकांकडून मिळालेला हा उत्कृष्ट प्रतिसाद

सिडकोच्या गृहनिर्माण उपक्रमावरील वाढता विश्वास अधोरेखित करणारा आहे.


“सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नवी मुंबईत स्वतःचे घर असावे, या
नागरिकांच्या आकांक्षेचे तसेच सिडकोच्या नियोजित विकासावर असलेल्या त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.
नागरिकांना नियोजित परिसरात परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देतानाच नवी मुंबईतील
वाढत्या पायाभूत सुविधा आणि उत्तम कनेक्टिविटीचा लाभ मिळवून देण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे.”

- अश्विन मुद्गल: उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको


प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ₹२.५ लाखांचे अनुदान सप्टेंबर

२०२६ पर्यंत उपलब्ध आहे. लागू असलेल्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वे व पात्रता निकषांच्या अधीन राहून

मिळणाऱ्या या अनुदानामुळे पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे.

नागरिकांना स्वतःचे घर घेण्याची संधी अधिक सुलभ व्हावी आणि नियोजित नागरी केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण घरे

उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सिडकोकडून सातत्याने गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. तळोजा,

खारघर आणि कळंबोली हे नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेले नोड्स असून, या परिसरांमध्ये

पायाभूत सुविधा आणि संपर्कव्यवस्थेचा विस्तार होत आहे.


या योजनेतील लॉटरी अर्जदारांची प्रारूप यादी सिडको होम्सच्या www.cidcohomes.com पोर्टलवर

दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप यादीबाबतचे आक्षेप ८ सप्टेंबर २०२६


पर्यंत नोंदविता येतील व अंतिम यादी १० सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी प्रक्रिया आणि

पुढील टप्प्यांबाबतची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.


बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

सिडकोतर्फे गुणवंतांचा सत्कार संपन्न

मुंबई, ता. २२- नवी मुंबई येथील सिडको भवनमध्ये सिडकोतर्फे नुकताच नवी मुंबईतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक व शाळांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, शिक्षण हा एक यज्ञ असून त्यात आपल्या श्रमाची आहुती टाकल्यानंतर त्यातून येणारी निष्पत्ती ही देशाचे भाग्य असते. गुणवंत विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन आपली कारकीर्द घडविण्यापेक्षा आपल्या देशाच्या महासत्तेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातच आपले योगदान द्यावे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांनी सांगितल्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणे हे कल्याणकारी राज्यांचे धोरण असावे.
नोडल क्षेत्रासाठी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नेरूळ येथील अपीजय स्कूलच्या चंद्रिका एरी, दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळच्या मोनिका शर्मा, खारघरच्या अपीजय स्कूलच्या कुसुम प्रजापती, ज्युडिथ जॉन यांना देण्यात आला. प्रकल्प क्षेत्रासाठी बेलापूर येथील विद्या प्रसारक हायस्कूलचे विश्वास ठाकूर, कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्था हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शोभा पाटील, ज्युनियर कॉलेजचे अशोक बदाडे यांना प्रत्येकी रोख रूपये दहा हजार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबईतून इ. दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या अपूर्वा सावंत, सीबीएसई बोर्डाच्या श्वेता म्हात्रे, आयसीएसई बोर्डाच्या अंकिता डे, आयसीएसई बोर्डाचा रक्षित शेट्टी यांना प्रत्येकी रोख रुपये पाच हजार एक देण्यात आले. 
सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, संचालक नामदेव भगत, मुख्य नियोजक, एम. डी. लेले, नवी मुंबई स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष फादर अल्मेडा, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी रिमा दीक्षित, उत्कृष्ट शिक्षक व शाळा निवड समिती सदस्या डॉ. प्रियंवदा देसाई, रेखा रोहिरा आणि स्नेहल देशमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. प्रास्ताविक रिमा दीक्षित, सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी आणि आभार दीपा गायकवाड यांनी मानले.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...