मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी...