मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कांदा निर्यात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कांद्याची निर्यात थांबविणे स्तुत्य

शासनाने भारतातून केली जाणारी कांद्याची निर्यात तूर्त थांबविली आहे. सद्य परिस्थितीत उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आणि स्तुत्य आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा, द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गुदामांमध्ये साठविलेला कांदा अक्षरशः सडल्यामुळे फेकून द्यावा लागला. यातही, जीवो जीवस्य जीवनम्.. प्रमाणे केवळ हातांवर आणि पायांवरच पोट चालणार्‍या घटकांनी यातूनही थोडा सुस्थित असलेला कांदा वेचून विकला आणि काही दिवस कशीबशी उपजिवीका सुरू ठेवली. मात्र व्हायचे तेच होऊन हा कांदा देखील अंकूरल्यामुळे फेकून द्यावा लागला. बाजारपेठेतून कांदा पूर्णपणे नाहीसा होण्याची चिन्हं दिसू लागली. धनदांडगे व्यापारी आणि काही गुदामांमध्ये असलेला उर्वरित कांदा चढ्या भावाने विक्रीस सुरवात होऊन याचा परिपाक म्हणजे अवघ्या आठ ते बारा रुपये प्रति किलो दराने मिळणारा कांदा आज महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पन्नास ते सत्तर च्या घरात पोहोचला आहे. शासनाने नुकतीच तातडीची बैठक बोलावून सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन देशातून केली जाणारी कांद्याची निर्यात थांबविण्याचे आदेश नाफेडला दिले आहेत. किंमतीचा उंचावणारा आलेख कुठेतर