मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन...